AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma Retirement: विराटसोबत ‘गंभीर’ चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली, गिलने मालिकेपूर्वीच दिली होती सर्वात मोठी हिंट

भारत आणि इंग्लंड मालिकेतील शेवटचा सामना शिल्लक आहे जो रोहित शर्माचा शेवटचा सामना असणार आहे. पण असं घडणार अशी हिंट कर्णधार शुभमन गिलने आधीच दिली होती.

Rohit Sharma Retirement: विराटसोबत 'गंभीर' चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली, गिलने मालिकेपूर्वीच दिली होती सर्वात मोठी हिंट
rohit sharma retirement
| Updated on: Jul 17, 2026 | 9:50 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील दोन सामने पार पडले. या मालिकेतील एक सामना भारतीय ंसंघाने जिंकला तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. आता मालिकेत दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहे. पुढील सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरोचा असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर मालिकेची शेवटची वनडे मॅच होणार आहे. हा सामना रोहितच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधला शेवटचा सामना असणार अशी चर्चा सुरु आहे. पण रोहितची ही मालिका शेवटची असणार आहे याबाबतची हिंट कर्णधार शुभमन गिलने आधीच दिली होती. मालिका सुरु होण्याआधीच गिलने यावर स्पष्ट भाष्य केले असल्याचे म्हटले जात आहे.

निवड समिती प्रमुख अजित आगरकर सध्या इंग्लंडमध्येच आहेत असे वृत्त समोर आले आहे. मागच्याच आठवड्यात निवड समिती, टीमचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. निवड समितीला यशस्वी जयस्वालसारख्या तरुण खेळाडूंना वनडे वर्ल्ड कपआधी संधी द्यायची आहे. 2027 वनडे वर्ल्ड कपआधी जयस्वालला काहीतरी सामने खेळायची संधी मिळावी अशी इच्छा टीम मॅनेजमेंटची आहे.. तसंच रोहितने जर धावा केल्या नाही तर तो वनडे वर्ल्ड कपच्या रणनीतीचा भाग नसल्याचंही निवड समितीने आधीच स्पष्ट केलं आहे. रोहित अनफिट आहे त्याचा फॉर्म नाही अशी कारणे देऊन त्याला वगळण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण रोहितने मागील काही काळात त्याच्या फिटनेसवर काम केले आहे. फॉर्म म्हणाल तर रोहित कधीही कमबॅक करु शकतो. तो जास्त काळ धावांपासून दूर राहु शकत नाही.  पण रोहित वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही याबद्दल मालिकेपूर्वीच हिंट मिळाली होती.

रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबाबत मालिकेच्या सुरूवातीलाच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता, कारण मालिका आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार शुभमन गिलने एक विधान केले होते.  गिल म्हणाला होता की, “विराटसोबत वनडे वर्ल्ड कपच्या तयारीबाबत आणि टीम कॉम्बिनेशनबाबत चर्चा आधीच झाली होती. कोणते खेळाडू टीमच्या कॉम्बिनेशमध्ये बसतात, तसेच सध्या टीममध्ये नसलेल्या कोणत्या खेळाडूंना आपण संधी दिली जाऊ शकतो, याबाबत विराटशी चर्चा झाली आहे.” आता यावरुन असं समजतं की गिलने त्याच्या बोलण्यात कुठेच रोहितचा उल्लेख केलेला नाही. यामुळे रोहितसाठी इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना हा त्याचा आंतरराष्ट्रीय सामना असून शकतो.

Follow Us
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत