एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; सामना गमावताच घेतला मोठा निर्णय

क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. सामना गमावताच एकाचवेळी तीन खेळाडूंनी आलपी निवृत्ती जाहीर केली.

एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; सामना गमावताच घेतला मोठा निर्णय
sophie devine suzie bates lea tahuhu retitrement
| Updated on: Jun 28, 2026 | 3:54 PM

शनिवार, 27 जून, ही न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी एक निराशाजनक संध्याकाळ होती. गतविजेत्या न्यूझीलंडने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकातून निराशाजनक निरोप घेतला. आयर्लंडने वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्यासाठी उपांत्य फेरीतील स्थानाचा मार्ग मोकळा झाला होता, परंतु किवी संघ इंग्लंडच्या महिला संघासमोर टिकू शकला नाही. गट फेरीतील अंतिम सामन्यात त्यांना इंग्लंडकडून नऊ गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. हा पराभव किवी संघासाठी हृदयद्रावक होता आणि याच सामन्यात त्यांच्या तीन सर्वात अनुभवी खेळाडूंनी—सुझी बेट्स, सोफी डिव्हाईन आणि लीया ताहुहू निवृत्ती घेतली.

महिला टी-20 विश्वचषकाच्या 10व्या आवृत्तीच्या ‘ब’ गटातील दोन्ही उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. गतविजेत्या न्यूझीलंडचा प्रवास संपला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून मानहानिकारक पराभव झाल्याने न्यूझीलंड स्पर्धेतून बाहेर पडले. या गटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने अव्वल चार स्थाने पटकावली. इंग्लंडकडून झालेल्या या पराभवामुळे न्यूझीलंडच्या तीन दिग्गज खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला. सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि लीया ताहुहू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. न्यूझीलंडला या तीन दिग्गजांना विजयासह निरोप द्यायचा होता, पण त्याऐवजी त्यांना मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

Loading...

सामन्यानंतर, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी निवृत्त झालेल्या तीन खेळाडूंना मानवंदना दिली. सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि लीया ताहुहू यांच्या डोळ्यात अश्रू होते. या तिन्ही दिग्गज खेळाडू भावूक झाल्या होत्या. आजचा सामना भारतासाठी ‘करा किंवा मरा’ असा आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज ‘गट ब’ मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत, पण ‘गट ब’चा निकाल आज लागणार आहे. आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हे सामने आहेत. ऑस्ट्रेलियाचे 8 गुण आहेत, तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 6 गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल. जरी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवून ८ गुण मिळवले, तरी भारताचा नेट रन रेट (+2.268) चांगला आहे. मात्र, जर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका जिंकले, तर भारताचा टी-20 विश्वचषक 2026 मधील प्रवास संपेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us