AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच उरुग्वे संघाला शिक्षा, चार्टर फ्लाइट केलं रद्द! आता परतणार कसे?

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या फेरीतून दिग्गज उरुग्वे संघ बाद झाला आहे. एच गटात एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे संघाच्या फुटबॉल असोसिएशनने दणका दिला.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच उरुग्वे संघाला शिक्षा, चार्टर फ्लाइट केलं रद्द! आता परतणार कसे?
फिफा वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच उरुग्वे संघाला शिक्षा, चार्टर फ्लाइट केलं रद्द! आता परतणार कसे?Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 28, 2026 | 4:52 PM
Share

Uruguay, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपले असून राउंड ऑफ 32 फेरीचे सामने सुरू होणार आहेत. असं असताना साखळी फेरीत एच गटात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या साखळी फेरीतच उरुग्वे संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत उरुग्वे संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. या निराशाजनक कामगिरीनंतर उरुग्वे फुटबॉल असोसिएशनने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. खेळाडू आणि कोचिंग स्टाफसाठी बूक केलेलं विशेष चार्टर फ्लाइट रद्द केलं आहे. कोणत्याही मोठ्या स्पर्धेनंतर राष्ट्रीय संघ त्यांच्या महासंघानी बुक केलेल्या चार्टर विमानाने एकत्रित मायदेशी परततात. पण उरुग्वे फुटबॉल असोसिएशनने मेक्सिकोमधील त्यांच्या बेस कॅम्पवरून राजधानी मॉन्टेव्हिडिओला जाणारे चार्टर विमान रद्द केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, फेडरेशनने हा निर्णय वर्ल्डकप स्पर्धेतून धक्कादायक आणि अपेक्षाआधीच बाद झाल्याने घेतला आहे.

उरुग्वे फुटबॉल महासंघाने चार्टर फ्लाईट रद्द केल्याने आता संपू्र्ण संघाला एकत्र येता येणार नाही. सर्व फुटबॉलपटू आणि कर्मचारी सदस्यांना आता व्यावसायिक विमानाद्वारे आपल्या प्रवासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. दुसरीकडे, महासंघाने बजेटचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि खेळाडूंना त्यांच्या इच्छेनुसार सुट्टीवर किंवा आपापल्या क्लबमध्ये परत जाण्याची मुभा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे.  काही खेळाडू सुट्ट्यांसाठी किंवा युरोप आणि इतर देशातील क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी थेट मॉन्टेव्हिडिओला परततील.

उरुग्वेची सुमार कामगिरी

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दोन वेळचा वर्ल्डकप विजेता उरुग्वे संघ एच गटात होता. या गटात स्पेन, केप वर्डे आणि सौदी अरब हे संघ होते. या गटातून स्पेन आणि उरुग्वे पुढच्या फेरीत जागा मिळवतील असंच सुरूवातीला वाटलं होतं. पण या स्पर्धेत उलटफेर पाहायला मिळाला. उरुग्वे सौदी अरब आणि केप वर्डेविरुद्धचा सामना जिंकण्यात अपयशी ठरले. हे दोन्ही सामने अनिर्णित ठरले. त्यामुळे शेवटचा सामना करो या मरोची लढाई होती. पण स्पेनने उरुग्वेला 1-0 ने मात दिली आणि स्वप्न भंग झाला. या गटातून स्पेन आणि केप वर्डे राउंड ऑफ 32 मध्ये पोहोचले.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...