Sourav Ganguly : रिषभ पंतची धोनीशी तुलना, सौरव गांगुलीची खोचक कमेंट, म्हणतो…

'तुलनेचं स्वरुप काहीही असेल पण रिषभ प्रतिस्पर्धी संघाकडून अक्षरश: मॅच खेचून आणतो', असं गांगुलीने म्हटलं आहे. | Sourav Ganguly

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:33 PM, 9 Mar 2021
Sourav Ganguly : रिषभ पंतची धोनीशी तुलना, सौरव गांगुलीची खोचक कमेंट, म्हणतो...
Sourav Ganguly

मुंबई : भारताचा आक्रमक विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतने (Rishabh pant) जेव्हापासून भारतीय संघात पाऊल ठेवलंय तेव्हापासून त्याची तुलना भारताचा सर्वश्रेष्ठ माजी कर्णधार एम.एस.धोनीशी (MS Dhoni) होतीय. पाठीमागच्या काही सामन्यात रिषभने आपल्या बॅटची जादू दाखवलीय तसंच यष्टीरक्षणातही चपळाई दाखवत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना माघारी घाडलंय. याच रिषभ-धोनीच्या तुलनेवर भारताचा माजी खेळाडू कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav ganguly) काहीशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुलनेचं स्वरुप काहीही असेल पण रिषभ प्रतिस्पर्धी संघाकडून अक्षरश: मॅच खेचून आणतो’, असं गांगुलीने म्हटलं आहे. (Sourav Ganguly On Rishabh pant And MS Dhoni)

काय म्हणाला सौरव…?

रिषभ पंत हा जवळपास धोनीसारखाच खेळाडू आहे. तो सामना जिंकणारा खेळाडू आहे. तो विरोधी संघाच्या गोटातून कधीही सामना फिरवू शकतो. तो अविश्वसनीय शॉट्स खेळतो. पंत आपल्या संघाला सामना जिंकून देण्याची जिद्द ठेवतो. मग तो कसोटी, असो एकदिवसीय असो वा टी -20 असो. तो नैसर्गिकरित्या आक्रमक खेळाडू आहे. तो त्याचे शॉट्स खेळतो. तो काही मिनिटांत सामन्याचा ट्रेंड बदलू शकतो, अशी स्ततीसुमने सौरवने उधळली आहेत.

रिषभला ऑस्ट्रेलियात मिळाली होती संधी

रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली होती. अॅडलेडच्या पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही पणम मेलबर्नमध्ये संधी मिळाल्यावर त्याने मागे वळून पाहिलं नाही. सिडनी कसोटीत त्याने 97 धावांची जबाबदार खेळी खेळली. ज्याच्या बळावर भारताने ती टेस्ट मॅच ड्रॉ केली. जर त्या टेस्ट मॅचमध्ये रिषभ खेळपट्टीवर आणखी काही वेळ राहिला असता तर ती मॅच भारताने कदाचित जिंकली असती.

सिडनीच्या सामन्याची उणीव रिषभने ब्रिस्बेन कसोटीत भरुन काढली. 89 रन्सची नाबाद खेळी रिषभने केली. टीमला विजय मिळवून दिलाच शिवाय भारतीय संघाने मालिकाही खिशात घातली.

इंग्वंडविरुद्धही जबरदस्त बॅटिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या दमदार कामगिरीनंतर त्याचा तोच फॉर्म इंग्लंडविरुद्धही कायम आहे. अहमदाबादच्या शेवटच्या मॅचमध्ये त्याने शानदार शतक झळकावलं तर आपल्या विकेट कीपिंगने दिग्गजांना आपलं कौतुक करण्यास भाग पाडलं.

(Sourav Ganguly On Rishabh pant And MS Dhoni)

हे ही वाचा :

ठरलं! जसप्रीत बुमराहच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी गोव्यात संजना गणेशनसोबत बांधणार लगीनगाठ

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी