ठरलं! जसप्रीत बुमराहच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी गोव्यात संजना गणेशनसोबत बांधणार लगीनगाठ

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह ( jasprit Bumrah) लवकरच लग्नबेडित अडकणार आहे. लग्नासाठी बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:11 AM, 9 Mar 2021
ठरलं! जसप्रीत बुमराहच्या लग्नाचा बार उडणार; 'या' दिवशी गोव्यात संजना गणेशनसोबत बांधणार लगीनगाठ
Jasprit Bumrah - Sanjana Ganesan

मुंबई : टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (jasprit bumrah marriage) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. बुमराहने काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून आणि त्यानंतरच्या टी-20 मालिकेतून माघार घेतली. मात्र सु्ट्टी घेण्यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. बुमराह लवकरच लग्नबेडित अडकणार आहे. (Jasprit Bumrah to Marry Sports Presenter Sanjana Ganesan in Goa on march 13 or 14)

बुमराहची होणारी भावी (jasprit bumrah Wife) बायको कोण आहे? याबाबत सुरुवातीला दोन नावांची जोरदार चर्चा होती. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर सजंना गणेशन (Sanjana Ganesan) हिच्याशी लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन (Anupama Parameswaran) हिच्याशी जोडलं जात होतं.

दरम्यान, आता अशी माहिती मिळाली आहे की, बुमराह या वीकेंडला म्हणजेच 13 किंवा 14 मार्चला गोव्यात संजना हिच्यासोबत सात फेरे घेणार आहे. संजना प्रसिद्ध क्रिकेट प्रेंझेंटेटर आहे. संजनाने आतापर्यंत क्रिकेटशी संबंधित अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पार पाडले आहेत. तसेच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी फॅन शो होस्ट केला आहे. संजनाने यापूर्वी अनेकवेळा बुमराहशी क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमांमध्ये भेट झाली आहे. यापूर्वी तिने एकदा बुमराहची मुलाखतही घेतली आहे.

संजना आणि बुमराह विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही यापूर्वी अनेकदा क्रिकेटशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. परंतु त्यांच्या नात्याबद्दल कधीच कोणतीही माहिती माध्यमांसमोर आली नाही. बुमराह आणि संजना दोघेही आपलं नातं सर्वांपासून लपवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

बुमराहच्या लग्नात टीम इंडियातील खेळाडूंची अनुपस्थिती

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका नुकतीच जिंकली आहे. उभय संघांमध्ये आता टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. कोव्हिड-19 मुळे बनवलेल्या नियमांमुळे दोन्ही संघ सध्या बायो बबलमध्ये आहेत. त्यातून बाहेर पडून कोणताही खेळाडू बुमराहच्या लग्नाला उपस्थित राहू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

इतर बातम्या

India Vs England T 20 : सर्वाधिक षटकार खेचणारे 5 फलंदाज, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ खेळाडू, रोहितचा नंबर कितवा?

IPL 2021 | ‘या’ स्टार क्रिकेटपटूला तुम्ही ओळखलंत का?

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी

(Jasprit Bumrah to Marry Sports Presenter Sanjana Ganesan in Goa on march 13 or 14)