AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : त्यावेळी आयपीएलमध्ये गावस्करांना विचारलं, कोणत्या अधिकारात तुम्ही हे केलं, पण आज तोच फॉर्म्युला हिट

Sunil Gavaskar : क्रिकेट या खेळाचं बारकाईने विश्लेषण करणारा खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करताना त्यांनी देशासाठी बरच काही केलं. पण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मैदानाबाहेर बसूनही त्यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही.

Sunil Gavaskar : त्यावेळी आयपीएलमध्ये गावस्करांना विचारलं, कोणत्या अधिकारात तुम्ही हे केलं, पण आज तोच फॉर्म्युला हिट
Sunil GavaskarImage Credit source: Philip Brown/Getty Images
| Updated on: May 12, 2026 | 4:26 PM
Share

भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणजे सचिन तेंडुलकर आणि लिटिल मास्टर म्हणजे सुनील गावस्कर. 1987 साली सुनील गावस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळले. त्यानंतर ते भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावत आहेत. सध्या ते यशस्वी कॉमेंटेटर म्हणजे समालोचक आहेत. भारतीय क्रिकेटमधील घडामोडींवर त्यांचं अत्यंत बारीक लक्ष असतं. सुनील गावस्कर हे 2010 साली आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचा भाग होते. मिड डे या वर्तमानपत्रात सुनील गावस्कर हे स्तंभ लेखन करतात. त्यात त्यांनी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचा सदस्य असण्याच्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. गव्हर्निंग काऊन्सिल मधल्याच एक मेंबरने त्यांना कसा जाब विचारला होता, या बद्दलचा किस्सा सुनील गावस्कर यांनी सांगितला आहे.

“अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचा सदस्य होतो, तेव्हा मी माझ्या अधिकार क्षेत्रात आठ फ्रेंचायजींच्या कॅप्टन्सना पत्र लिहिलेलं. मी त्यांना विचारलेलं की, आता आयपीएल ज्या स्वरुपात आहे, त्यापेक्षा आपण ती आणखी कशी उत्तम करु शकतो?. अनेकांनी त्या पत्राला प्रतिसाद दिला. पण फार काही मोठा सल्ला नव्हता. त्यावेळी एडम गिलख्रिस्टने एक वेगळा सल्ला दिलेला. ज्या टीम पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असतील, त्यांना क्वालिफायर आणि एलिमिनेटरच्या माध्यमातून आणखी एक संधी द्यावी, तो एक पूर्णपणे वेगळा सल्ला होता” असं गावस्कर यांनी आपल्या स्तंभात लिहिलं आहे.

मला जाब विचारला

“गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने यावरुन मला जाब विचारला. कोणाच्या परवानगीने मी फ्रेंचायजीच्या कर्णधारांना पत्र लिहून सल्ले मागितले?. माजी कर्णधार या नात्याने मी माझ्या अधिकार क्षेत्रात हे लिहिलं आहे. आयपीएल अजून कशी चांगली होईल हा माझा हेतू आहे. पत्र लिहिण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही” असं उत्तर गावस्कर यांनी दिलेलं.

त्याचं बेबीचं सुदृढ प्रौढ व्यक्तीमध्ये रुपांतर

“आता हे गव्हर्निंग काऊन्सिलवर आहे ते स्वीकारायचं की नाही. तो प्रस्ताव स्वीकारला. आता प्रत्येक फ्रेंचायजीचा पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांना अजून एक संधी मिळते” असं गावस्कर यांनी स्तंभात लिहिलं आहे. “उद्घाटनाच्या गव्हर्निंग काऊन्सिलचं सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी भाग होणं हा एक सुखद अनुभव होता. आयपीएल त्यावेळी बेबी होती. आता त्याचं बेबीचं सुदृढ प्रौढ व्यक्तीमध्ये रुपांतर झाल्याचं पाहून आनंद होतो” असं गावस्कर म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी