Sunil Gavaskar : ‘त्यांना आधी संधी द्या’, सुनील गावस्कर यांचा मुंबई इंडियन्सला मोलाचा सल्ला

Sunil Gavaskar : मुंबई इंडियन्स टीमला आता प्लेऑफमध्ये चान्स नाहीय. त्यांचं आव्हान संपुष्टात आलय. पण सुनील गावस्कर यांनी या टीमचे चाहते म्हणून मुंबई टीमच्या व्यवस्थापनाला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

Sunil Gavaskar : त्यांना आधी संधी द्या, सुनील गावस्कर यांचा मुंबई इंडियन्सला मोलाचा सल्ला
Sunil Gavaskar
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 15, 2026 | 2:55 PM

मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफ शर्यतीतून आधीच बाहेर गेली आहे. पण महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला जास्तीत जास्त टीममधल्या युवा खेळाडूंना संधी देण्याचं आवाहन केलं आहे. “त्यांना आता संधी दिली, तर पुढच्या सीजनमध्ये त्यांना कसं खेळवायचं? त्यांची क्षमता, कमकुवत बाजू दोन्ही समजतील” असं सुनील गावस्कर म्हणाले. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याआधी सुनील गावस्कर यांनी हे आवाहन केलं होतं. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लास्ट ओव्हरमध्ये पंजाब किंग्सवर मात केली. रोमांचक सामन्यात मुंबईने पंजाबवर 6 विकेट आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. हा सामना जिंकूनही मुंबईचा काहीच फायदा नाहीय. कारण ते प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेले आहेत. पण हरल्यामुळे पंजाब किंग्सचा मार्ग मात्र खडतर बनला.

पंजाबची टीम अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. आता त्यांना पुढचे दोन सामने जिंकावेच लागतील. चालू सीजनमध्ये पंजाब किंग्सच्या टीमने दमदार सुरुवात केली होती. सलग विजयानंतर पंजाब किंग्सची आता पराभवाची मालिका सुरु आहे. त्यामुळे पंजाब टीमचा कर्णधार श्रेयस अय्यरवरील दबाव वाढला आहे. मुंबई इंडियन्सचे पाठिराखे म्हणून सुनील गावस्कर यांनी टीमला शेवटच्या काही सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याच आवाहन केलं.

..तेव्हा आसपास पहा

“सलग चार सामने गमावल्यानंतर पंजाब किंग्सला काहीही करुन जिंकायचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वत:वर संशय घेऊ लागता, तेव्हा आसपास पहा. तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करायची गरज आहे की, काही वेगळं करायची. पंजाबला जिंकायचं आहे” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले.

व्यवस्थापनाने यावर निर्णय घ्यावा

“मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झाल्यास मी मुंबई इंडियन्सचा सपोर्टर आहे. आता ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. त्यांनी युवा खेळाडूंना संधी द्यावी असं मला वाटतं. व्यवस्थापनाने यावर निर्णय घ्यावा. काही युवा खेळाडू त्यांनी रिझर्व्ह मध्ये ठेवले आहेत. ज्यांना अजून काही सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. त्यांना उर्वरित तीन सामन्यात संधी द्या. त्यानंतर पुढच्या सीजनमध्ये त्यांना टीममध्ये कसं खेळवायचं हे तुमच्या लक्षात येईल” असं गावस्कर म्हणाले.

Follow Us