AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : तिलक वर्माची फायर खेळी, मुंबईकडून हिशोब चुकता, पंजाबचा सलग पाचवा पराभव

Punjab Kings vs Mumbai Indians Match Result, IPL 2026 : मुंबईने तिलक वर्मा याच्या नाबाद खेळीच्या जोरावर 2 गुणांची कमाई करत गेल्या पराभवाचा अचूक हिशोब केला आहे. तर पंजाब सलग पाचव्यांदा अपयशी ठरली आहे.

PBKS vs MI : तिलक वर्माची फायर खेळी, मुंबईकडून हिशोब चुकता, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Tilak Varma MI vs PBKS IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 15, 2026 | 7:21 AM
Share

तिलक वर्मा याने केलेल्या नाबाद आणि झंझावाती खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील 58 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. प्रभसिमरन सिंह याचं अर्धशतक आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर पंजाबने धर्मशालेतील मैदानात मुंबईसमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 1 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. मुंबईने या विजयासह पंजाबचा हिशोब केला. पंजाबने मुंबईला या मोसमात याआधी पराभूत केलं होतं. मुंबईने या विजयासह एकूण चौथा सामना जिंकला. तर पंजाबचा सलग आणि एकूण पाचवा पराभव ठरला आहे. त्यामुळे आता पंजाबचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं आहे.

सामन्यात काय झालं?

सूर्यकुमार यादव याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. बुमराहने फिल्डिंगचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबच्या टॉप ऑर्डरने जबरदस्त बॅटिंग करत अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. मात्र पलटणच्या गोलंदाजांनी टॉप ऑर्डरला ढेर करुन मधल्या फळीतील फलंदाजांना स्वस्तात गुंडाळलं. मात्र खालच्या फलंदाजांनी पंजाबसाठी निर्णायक योगदान दिलं आणि टीमला 200 धावांपर्यंत पोहचवलं.

पंजाबची बॅटिंग

पंजाबसाठी प्रभसिमरन सिंह याने सर्वाधिक 57 धावा केल्या. प्रियांश आर्या याने 22 तर कूपर कोनोली याने 21 धावा जोडल्या. मिडल ऑर्डरमधील तिघांना दुहेरी आकडा गाठण्याआधी मुंबईच्या गोलंदाजांनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कॅप्टन श्रेयस अय्यर 4, सूर्यांश शेडगे 8 आणि शशांक सिंह याने 2 धावा केल्या.

त्यानंतर अझमतुल्लाह ओमरझई याने 17 चेंडूत 38 रन्सची फायर खेळी केली. मार्को यान्सेन 2 धावा करुन बाहेर गेला. तर विष्णू विनोद आणि झेव्हीयर बार्टलेट हे दोघे नाबाद परतले. विष्णूने 15 आणि झेव्हीयरने 18 धावा केल्या. मुंबईसाठी शार्दूल ठाकुर याने 4 विकेट्स मिळवल्या. दीपक चाहर याने दोघांना गुंडाळलं. तर कॉर्बिन बॉश आणि राज बावा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

मुंबईची जबरदस्त सुरुवात

इम्पॅक्ट प्लेअर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने मुंबईला कडक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 61 धावा जोडल्या. त्यानंतर रायन 48 धावांवर बाद झाला. मुंबईसाठी त्यानंतर रोहित शर्मा आणि नमन धीर या दोघांनी काही धावा जोडल्या. मात्र त्यानंतर पंजाबने मुंबईला झटपट 2 झटके दिले. नमन धीर 9 आणि रोहित शर्मा 25 धावा करुन बाद झाले.

स्कोअरकार्ड

तिलकची फार खेळी

त्यानंतर तिलक वर्मा याने शेरफेन रुदरफोर्ड आणि विल जॅक्स याच्यासह चौथ्या  विकेटसाठी (61 धावा) आणि पाचव्या विकेटसाठी नॉट आऊट (56 धावा)* अर्धशतकी भागीदारी केली. शेरफेनने 20 धावांचं योगदान दिलं. तर तिलक वर्मा आणि विल जॅक्स मुंबईला विजयी करुन नाबाद परतले.

विल जॅक्सने 25 धावा केल्या. तर तिलकने 33 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 75 रन्स केल्या. पंजाबसाठी अझमतुल्लाह ओमरझई याने 2 विकेट्स घेतल्या. तर मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ