T 20 Cricket In Olympic | ऑलिम्पिकमध्ये टी – 20 क्रिकेटच्या समावेशासाठी समर्थन, क्रिकेटच्या विस्तारासाठी सज्ज : राहुल द्रविड

| Updated on: Nov 14, 2020 | 7:32 PM

आयसीसीच्या 2018 मधील सर्वेक्षणानुसार एकूण 87 टक्के समर्थकांनी ऑल्मपिकमध्ये टी 20 क्रिकेटचा समावेश करावा, असं मत व्यक्त केलं होतं.

T 20 Cricket In Olympic | ऑलिम्पिकमध्ये टी - 20 क्रिकेटच्या समावेशासाठी समर्थन, क्रिकेटच्या विस्तारासाठी सज्ज : राहुल द्रविड
Follow us on

मुंबई : क्रिकेटचा झटपट प्रकार म्हणजे टी 20 क्रिकेट. गेल्या दशकभरात या टी 20 प्रकाराला जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी पसंती दर्शवली. टी 20 क्रिकेटचा ऑल्मपिक स्पर्धेत (Olympic) समावेश करण्यात यावा, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरु लागलीये. ऑल्मपिकमध्ये टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, या मागणीचं टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट एकेडमीचा संचालक ‘द वॉल’ अर्थात राहुल द्रविडनेही (Rahul Dravid)समर्थन केलंय. support for the inclusion of t 20 cricket in the olympics ready for the expansion of cricket rahul dravid

द्रविड काय म्हणाला?

“टी 20 क्रिकेटचा ऑल्मपिकमध्ये समावेश केल्यास चांगलं होईल. यामुळे क्रिकेटला लाभच होईल. राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बदाले यांच्या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन करण्यात आलं. यावेळेस द्रविडने हे वक्तव्य केलं. द्रविड पुढे म्हणाला की “मला वाटते की जर क्रिकेट ऑलिम्पिक खेळ झाला तर ते नक्कीच प्रशंसनीय ठरेल. कारण एकूण 75 देशांमध्ये टी २० क्रिकेट खेळले जाते. अर्थात असे झाल्यास नवी संधींसह आव्हानेही असतील “, असंही द्रविड नमूद केलं. “टी 20 क्रिकेटचा ऑल्मपिकमध्ये समवेश झाल्यास नियोजन करावं लागेल. आणखी चांगल्या पद्धतीने सेवा पुरवावी लागेल. असं करण्यास तयारी असेल, तर मी ऑल्मपिकमध्ये टी 20 च्या समावेशाच्या निर्णायचं समर्थन करतो”, असंही द्रविड म्हणाला.

निरुत्साही बीसीसीआय

टी 20 क्रिकेटचा ऑल्मपिकमध्ये समावेश करावा का, यासाठी आयसीसीने 2018 मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार एकूण 87 टक्के समर्थकांनी ऑल्मपिकमध्ये टी 20 क्रिकेटचा समावेश करावा, असं मत व्यक्त केलं होतं. 2010 आणि 2014 मध्ये आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र बीसीसीआयने आपल्या संघांना पाठवलं नव्हतं.

संघवाढीच्या निर्णयाला द्रविडचा पाठिंबा

आयपीएलच्या आगामी मोसमात बीसीसाय संघवाढीसाठी हालचाल करत असल्याची चर्चा आहे. द्रविडने या निर्णयाचं समर्थन केलं. “आयपीएल स्पर्धेमुळे आतापर्यंत अनेक युवा खेळांडूना संधी मिळाली आहे. आयपीएलमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालंय. मात्र असेही काही खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्येही संधी मिळत नाही. त्यामुळे युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहता संघवाढीचा निर्णय योग्य असल्याचं द्रविड म्हणाला”. राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बदाले यांच्या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस द्रविडने हे वक्तव्य केलं. याबाबतचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. द्रविड पुढे म्हणाला की, “युवा खेळाडूंमध्ये असलेली प्रतिभा पाहता आयपीएल संघ वाढीसाठी तयार आहे. तसेच दररोज प्रतिभावान उदयनमुख खेळाडू समोर येत आहेत.”

मनोज बदालेंकडून समर्थन

मनोज बदालेंनीही या निर्णायचं स्वागत केलंय. “मात्र असं करताना या स्पर्धेच्या दर्ज्याला बाधा निर्माण होणार नाही, याबाबतही त्यांनी लक्ष वेधून घेतलं. तसेच संघ वाढल्यास बहुतेक सामने हे दुपारी खेळवावे लागतील”, असं बदाले म्हणाले.

दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीत दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे.

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंची कोरोना चाचणी नेगेटिव्ह, नेट्समध्ये कसून सराव

IND vs AUS : विराट कोहलीचा द्वेष करतो आणि प्रेमही, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचं गमतीशीर विधान

support for the inclusion of t 20 cricket in the olympics ready for the expansion of cricket rahul dravid