AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : विराट कोहलीचा द्वेष करतो आणि प्रेमही, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचं गमतीशीर विधान

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

IND vs AUS : विराट कोहलीचा द्वेष करतो आणि प्रेमही, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचं गमतीशीर विधान
| Updated on: Nov 14, 2020 | 5:17 PM
Share

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India vs Australia) सिडनीमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला एकदिवसीय मालिकेपासून सुरुवात होणार आहे. या एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात आहे. यानंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. मात्र खऱ्या अर्थाने सर्वांना कसोटी मालिकेसाठी उत्सुकता लागून राहिलं आहे. कसोटी मालिकेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये हमरीतुमरी पाहायला मिळते. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या निशाण्यावर विराट कोहली (Virat Kohli) असतो. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने विराट कोहलीबद्दल गमतीशीर वक्तव्य केलंय.

पेन काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेननुसार, “ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट चाहत्यांना कोहलीचा द्वेष करायला आवडतं. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी विराट हा इतर खेळाडूंप्रमाणेच आहे”. टीम पेन ऑस्ट्रेलियामधील एक क्रीडा वाहिनीशी संवाद साधत होता. त्यावेळेस तो बोलत होता. “ऑस्ट्रेलिया समर्थकांना विराटचा द्वेष करायला आवडतो. पण ऑस्ट्रेलियाचे समर्थक विराटच्या बॅटिंगचा आनंदही घेतात. त्याची बॅटिंग पाहणं आवडतं. मात्र त्याने मोठी खेळी केलेली आवडत नाही”, असं पेन म्हणाला. “विराट माझ्यासाठी इतर खेळाडूंसारखाच आहे. विराटबाबत मला फार प्रश्न विचारले जातात. मात्र मला त्याबाबत चीड येत नाही. विराट माझ्यासाठी इतर खेळाडूंसारखा आहे”, असं पेन म्हणाला. Australian captain Timothy David Paine funny statement on virat Kohli – hate him but also love

“विराटच्या वाकड्यात शिरु नका”

विराटच्या वाटेला जाऊ नका, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने काहीच दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिला होता. स्टीव्ह वॉने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाला विराटपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. “भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट मालिकांमध्ये खेळताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचणं, त्याच्यावर शाब्दिक बाणांनी हल्ला करणं आपल्यावरच उलटू शकतं, असा इशारा वॉने दिला.

“क्रिकेट सामन्यांदरम्यान विराट कोहलीला स्लेज करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याच संघावर भारी पडेल. स्लेजिंगच्या विराटवर पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो. कदाचित स्लेजिंग केल्यामुळे विराट अधिक जोशात खेळू शकतो. स्वीव्ह वॉच्या मते केवळ विराटच नव्हे तर त्याच्या संघातील इतर खेळाडूंनादेखील स्लेज करुन चालणार नाही. स्लेजिंगचा विराटवर परिणाम होणार नाही. कोणत्याही महान खेळाडूला याने काहीही फरक पडत नाही. अशा खेळाडूंना तुम्ही जितकी मोकळीक द्याल तेवढ चांगलं असतं. स्लेजिंग करुन तुम्ही त्याला अजून उत्तम खेळण्यास प्रवृत्त कराल. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला देईन की, त्यांनी विराटला काहीही बोलू नये”, असा सावधानतेचा इशारा वॉने दिला होता.

टीम इंडियाचे मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

Australian captain Timothy David Paine funny statement on virat Kohli – hate him but also love

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.