सूर्यादादानं रडवलं! टीम इंडियापासून अचानक दूर केल्यानंतर पहिल्यांदाच मनातल्या वेदना मोकळेपणानं सांगितल्या
सलग 5 वर्षे टीम इंडियासाठी खेळल्यानंतर अचानक संघाबाहेर राहणं सूर्यकुमार यादवांसाठी सोपं नाही. त्याने पहिल्यांदाच याबाबत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हटलंय सूर्यादादाने?

टीम इंडियाचा टी-२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाबाहेर आहे. सलग पाच वर्षे टीम इंडियाकडून खेळल्यानंतर अचानक संघातून बाहेर राहणं त्याच्यासाठी कठीण ठरत आहे.
सूर्यकुमारने नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. टीम इंडियापासून दूर राहणं वेदनादायी असल्याचं त्याने मान्य केलं. मात्र, या कठीण काळातही त्याने आशा सोडलेली नाही.
सूर्यकुमार यादव म्हणाला, 'निश्चितच टीम इंडियापासून दूर राहणं वेदनादायी आहे. तुम्ही सलग पाच वर्षे देशासाठी खेळता आणि त्यानंतर अचानक भारतासाठी खेळता येत नाही, तेव्हा वाईट वाटतं. पण खेळ असाच आहे.'
मागील दोन वर्षांत क्रिकेटने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्याचंही त्याने सांगितलं. आयपीएलनंतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. 'सुरंगाच्या शेवटी नेहमीच प्रकाश असतो, असं म्हटलं जातं. तोपर्यंत खेळ सुरू ठेवला पाहिजे,' असं सूर्यकुमारने म्हटलं.
सूर्यकुमार सध्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत दोन अर्धशतकं झळकावली आहेत. सध्या आयपीएलबाबत फारसा विचार करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.