
IND Vs NZ T20 WC Final: अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल रात्री ICC T-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रंगला. भारत वि न्युझीलंडच्या या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवत वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव तर कोरलंच पणसलग दुसऱ्यांदा स्पर्धआ जिंकत एक नवा इतिहास देखील रचला. हा सामना अकिशय थराराक, रोमांचक होताच. पण सामन्यात भारताची बॉलिंग सुरू असताना असं काही घडलं, ज्याने हाय व्होल्टेज ड्रामाही झाला. अंतिम सामन्यात भारताचा गोलंदाज, अर्शदीप सिंग आणि न्युझीलंडचा खेळाडू डॅरिल मिशेलशी वाद झाला. 11 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मात्र त्यानंतर किवी खेळाडी चांगलाच भडकला, त्याचं रौद्र रूप पाहून भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव यालाच मध्यस्थीसाठी धाव घ्यावी लागली. संपूर्ण मैदानात तेव्हा तणावाचं वातावरण होतं. असं नेमकं झालं तरी काय, चला जाणून घेऊया.
अर्शदीपवर ओरडला डेरिल मिशेल
11व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. तेव्हा मिशेलने त्याच्या दोन बॉलवर लागोपाठ दोन सिक्स मारल्या. काही चेंडूंनतर मिशेलने एक चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, जो सरपटत अर्शदीपच्या पुढ्यात आला. मात्र तेव्हाच अर्शदीपने संयम गमावला, त्याने तो बॉल उचललला आणि झटक्यात स्टंप्सच्या दिशेने फेकला, मात्र तो चेंडू मिशेलवर जाऊन आदळला. त्यामुळे न्युझीलंडचा उपकर्णधार डेरिल मिशेल चांगलाच भडकला, त्याने रौद्र रूप धारण केलं.
रागाने लाल झालेला मिशेल हा अर्शदीपवर ओरडताना दिसला. त्यामुळे संपूर्ण मैदानातच तणाव होता, प्रेक्षक संगळे शांत झाले. वातवरण तापलेला पाहून टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने मिशेलच्या दिशेने धाव घेतली आणि तो त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत होता. सूर्या मिशेलशी बोलला, त्याला समजावलं. तर दुसरीकडे अंपायरनेही अर्शदीपशी बोलून त्याला समजावून सांगितलं. या संपूर्ण घटनेने सर्वांचे श्वास रोखले गेले होते, या हाय व्होल्टेज क्षणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Final Hungama : Daryl Mitchell 🆚 Arshdeep Singh
Surya ಬಂದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲವೂ ಶಾಂತ… SKY Handle ಮಾಡಿದ ರೀತಿ ನಿಜಕ್ಕೂ ಅದ್ಬುತ!👏🏻🤝🏻
ವೀಕ್ಷಿಸಿ | ICC Men’s #T20WorldCup 👉🏻 FINAL | #INDvNZ | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#T20WorldCup2026Final pic.twitter.com/K4ECnGh9ra
— Star Sports Kannada (@StarSportsKan) March 8, 2026
अखेर झाला समेट
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अर्शदीपला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अखेर थोड्या वेळाने संगळ शातं झालं. कॅप्टन सूर्या आणि अंपायरने समजावल्यानंतर, ओव्हर संपल्यावर अर्शदीप आणि मिशेल यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत वाद तिथेच मिटवला आणि हे प्रकरण शांततेत सुटलं.
वादानंतर 13 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला मिशेल
त्यानंतरच्या षटकात, 13 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर न्यूझीलंडने सहावी विकेट गमावली. डॅरिल मिशेल 17 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा कॅच टिपला. अक्षरने त्याची तिसरी विकेट घेतली. न्यूझीलंड भारताच्या 256 धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करत होता. मात्र, पाहुण्या संघाने एकामागून एक विकेट गमावल्या.
भारताने हा सामना 96 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून इतिहास रचला. सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ बनला. तसेच तीन वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही टीम इंडियाने रचला.