T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्युझीलंड फायनल मॅच पाहण्यास उत्सुक ? तिकीट कितीला, कुठे मिळणार ? जाणून घ्या A to Z डिटेल्स

IND vs NZ T20 World Cup 2026 Final Tickets : टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्युझीलंड यांनी फायलनमध्ये प्रवेश केला असून 8 मार्चला अंतिम सामना होणार आहे. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये होणाऱ्या फायनल मॅचच तिकीटी किती रुपयांना, कशी मिळेल एंट्री, जाणून घ्या सर्वकाही...

T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्युझीलंड फायनल मॅच पाहण्यास उत्सुक ? तिकीट कितीला, कुठे मिळणार ? जाणून घ्या A to Z डिटेल्स
भारत वि. न्युझीलंड अंतिम सामना
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 2:13 PM

T20 World Cup 2026 Final Ticket : आयसीसीटी टी20 वर्ल्ड कप 2026 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कालच्या रोमांचक सेमी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, भारताने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आता जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी (IND vs NZ) होणार आहे. येत्या रविवारी, म्हणजेच 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच खेळली जाणार आहे. अेकांना ही मॅच पाहण्याची उत्सुकता आहे. या अंतिम सामन्याचं तिकीट बुकिंग आणि स्टेडियम एंट्रीमध्ये चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

कसं बूक कराल तिकीट ?

फायनल मॅचची तिकिटं ही अधिकृतपणे BookMyShow आणि ICC पोर्टलद्वारे विकली जात आहेत. जास्त मागणीमुळे, बहुतेक तिकिट श्रेणी सध्या “सोल्ड आउट” असं दिसत आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी अजूनही आशेला स्थान आहे.

सामान्यतः, मोठ्या सामन्यांच्या 24 ते 48 तास आधी काही तिकिटे पुन्हा जारी केली जातात. मुंबईत झालेल्या सेमीफायनलच्या मॅचदरम्यानही असंच घडलं होतं. त्यामुळे, ज्या चाहत्यांना तिकिटे मिळाली नाहीत त्यांनी अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

किती आहे किंमत ?

वरच्या स्टँडसाठी तिकिटांची किंमत सुमारे 3 हजारांपासून सुरू होते. तर प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आणि क्लब लाउंज सीट्सची किंमत 50 हजारे ते 75 हजार रुपयांच्या आसपास आहे.

स्टेडिअममधील एंट्रीसाठी कठोर नियम

रविवारी होणाऱ्या फायनल मॅचसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडियमचे दरवाजे दुपारी 4 वाजता उघडतील आणि सामना संध्याकाळी 7:०० वाजता सुरू होईल. सुरक्षा तपासणीत होणारा विलंब टाळण्यासाठी प्रेक्षकांना किमान तीन तास आधी येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र मॅचदरम्यान स्टेडियममध्ये अनेक वस्तू नेण्यास मनाई असेल. पॉवर बँक, बॅग्ज, पाण्याच्या बाटल्या आणि छत्री यासारख्या वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे. चाहत्यांना फक्त त्यांचे मोबाईल फोन आणि पाकीट आत आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. .

अहमदाबादच्या मोटेरा परिसरात असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे आणि त्याची बसण्याची क्षमता अंदाजे 1.3 लाख प्रेक्षकांची आहे. मोठ्या गर्दीमुळे मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीवर देखील परिणाम होऊ शकतो, म्हणून डिजिटल तिकिटे आधीच डाउनलोड करणे आणि ती ऑफलाइन सेव्ह करणे महत्वाचे आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील ही मॅच केवळ एक सामना नसून क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठा उत्सव असेल, विजेता को छरतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

 

Follow Us