IND vs ENG T20 World Cup 2026 : भारत-इंग्लड सेमी फायनल रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट ? ICC चा नियम काय ?

IND vs ENG Semifinal, T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप्चाय सेमीफायनलमध्ये कोणत्या संघांचा, कोणत्या 4 टीम एकमेकांशी भिडणार ते समोर आलं आहे. टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार असून 5 मार्च रोजी वानखेडेवर दोन्ही संघ, फायनलमधील प्रवेशासाठी एकमेकांशी झुंजतील.

IND vs ENG T20 World Cup 2026 : भारत-इंग्लड सेमी फायनल रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट ? ICC चा नियम काय ?
भारत वि. इंग्लंड
| Updated on: Mar 02, 2026 | 10:11 AM

IND vs ENG Semifinal, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्डकप 2026 आता नॉकआऊट स्टेजमध्ये पोहोचला आहे. भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्युझीलंडने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमधील पहिला सामना हा दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 5 मार्च रोजी मुंबबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील.

भारत-इंग्लंड सेमीफायनल रद्द झाली तर ?

उपांत्य फेरीचे म्हणजेच सेमीफायनलचे सामने म्हणजे नॉकआउट मॅच असतात आणि पराभूत संघ स्पर्धेतून डायरेक्ट बाहेर पडेल. म्हणूनच, आयसीसीने या प्रमुख सामन्यांसाठी विशेष नियम तयार केले आहेत. ग्रुप स्टेज आणि सुपूर 8 राऊंडमध्ये, सामना नियोजित तारखेला झाला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जातो. पण सेमी फायनलमध्ये असं होणार नाही. आयसीसीने दोन्ही सेमीफायनलसाठी राखीव दिवस म्हणजेच रिझर्व्ह डे निश्चित केला आहे. जर सामन्याच्या दिवशी पाऊस किंवा खराब हवामानामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

पण जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही खेल झाला नाही किंवा निकाल लागला नाही तर काय ? आयसीसीच्या नियमांनुसार, जर नॉकआउट टप्प्यातील (सेमीफायनल आणि फायनल) सामना अनिर्णित राहिला तर सुपर 8 फेरीच्या आधारे एक संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. सुपर 8 फेरीत जो संघ प्रथम स्थान मिळवेल तो अंतिम फेरीत पोहोचेल. इंग्लंडने ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं, तर भारताने ग्रुप 1 मधून दुसरे स्थान मिळवून पात्रता मिळवली. त्यामुळे जर भारत-इंग्लंड सेमीफायनल मॅच रद्द झाली तर इंग्लंडचा अंतिम फेरीत किंवा फायनलमध्ये पोहोचेल आणि टीम इंडिया न खेळताच बाहेर पडेल.

पहिल्या सेमीफायनलमध्ये फायदा कोणाला ?

टी 20 वर्ल्डकपमधील पहिली सेमीफायनल मॅच ही दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठीदेखील राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, जर तो सामनासुद्धा रद्द झाला तर दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. कारण ग्रुप 1 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर होता आणि ग्रुप 2 मध्ये न्युझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा होईल.

Follow Us