Team India 2023 Series Schedule: टीम इंडिया वर्ल्ड कपपर्यंत 28 वनडे खेळणार! आशिया कपसह संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Dec 09, 2022 | 2:05 PM

पुढील वर्षभरातील टीम इंडियाचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे.

Team India 2023 Series Schedule: टीम इंडिया वर्ल्ड कपपर्यंत 28 वनडे खेळणार! आशिया कपसह संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
Team India
Image Credit source: BCCI

मुंबई : टीम इंडियाचं (Team India) वर्षभरातील होणाऱ्या मॅचेसचं शेड्यूल (Schedule) बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलं आहे. विश्वचषक स्पर्धेतील लाजीरवाण्या पराभवनंतर बीसीसीआयने पहिल्यांदा निवड समिती बरखास्त केली होती. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निवड समितीचा अध्यक्ष नेमण्यात येणार आहे. टीम इंडिया सध्या बांगलादेशमध्ये मालिका खेळत आहे. पुढील वर्षभरातील टीम इंडियाचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे.

टीम इंडियाचे पुढील वर्षाचे वेळापत्रक

जानेवारी: श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय सामने: 3 T20 सामने: 3

जानेवारी-फेब्रुवारी: न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय सामने: 3 T20 सामने: 3

फेब्रुवारी-मार्च: घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामने: 3 कसोटी सामने: 3

जुलै-ऑगस्ट : घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामने: 2 एकदिवसीय सामने: 3 T20 सामने: 3

सप्टेंबर: आशिया कप 2023

आशिया चषक 2023 सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानच्या भूमीवर होण्याची शक्यता आहे, तथापि, अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह 12 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

सप्टेंबर-ऑक्टोबर: घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामने: 3 T20 सामने: 5

ऑक्टोबर-नोव्हेंबर: एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाईल

हे सुद्धा वाचा

या स्पर्धेत 48 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI