AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : हार्दिक पांड्याचा घटस्फोटानंतर आणखी एका स्टार क्रिकेटरच्या संसारात वादळ, घटस्फोटाची चर्चा

Team India : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा यावर्षी घटस्फोट झाला. आता आणखी एका स्टार क्रिकेटर पत्नीपासून वेगळा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पती-पत्नी दोघांच्या सोशल मीडियामधूनच तसे संकेत मिळाले आहेत. एका बॉलिवूड प्रोड्युसरने तर दोघे वेगळे झाल्याचा दावा केला आहे.

Team India : हार्दिक पांड्याचा घटस्फोटानंतर आणखी एका स्टार क्रिकेटरच्या संसारात वादळ, घटस्फोटाची चर्चा
Hardik Pandya-natasha sankovitch
| Updated on: Dec 24, 2024 | 7:51 AM
Share

यंदाच्या वर्षी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर हार्दिक पांड्याने नताशा स्टानकोविक पासून घटस्फोट घेत असल्याच जाहीर केलं. वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून हे संकेत मिळत होते. आता टीम इंडियाच्या आणखी एका स्टार क्रिकेटपटूचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. वर्ष 2024 ला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण त्याआधी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहलच्या व्यक्तीगत आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळतायत. युजवेंद्र चहल आधीच टीम इंडियाच्या बाहेर आहे. आता त्याचे पत्नी धनश्री वर्मासोबत संबंध बिघडल्याचे संकेत मिळत आहेत. युजवेंद्र-धनश्रीच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. आता दोघे वेगळे होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट सर्व काही ठिक सुरु नसल्याचे संकेत देत आहे.

2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन होतं. त्याचवेळी स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलची धनश्री बरोबर ओळख झाली. दोघांनी लग्न केलं. 22 डिसेंबर 2020 रोजी दोघांच लग्न झालं. त्यानंतर दोघे एकत्र दिसायचे. सोशल मीडिया पोस्टमधून परस्परांबद्दलच प्रेम व्यक्त करायचे. मागच्यावर्षी सुद्धा दोघांनी लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. पण यावर्षी धनश्री आणि चहल दोघांपैकी कोणी असं केलेलं नाही. 22 डिसेंबर 2024 ला त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. पण दोघांपैकी कोणीही सोशल मीडियावर शुभेच्छांची पोस्ट केली नाही.

बॉलिवूड प्रोड्यूसरचा दोघे वेगळे झाल्याचा दावा

लग्नाच्या वाढदिवसाच्या परस्परांना शुभेच्छा न दिल्यामुळे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. कारण दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अशावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा न देणं ही गोष्ट फॅन्सच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. इतकच नाही, बॉलिवूड प्रोड्यूसर आणि फिल्म क्रिटिक कमाल आर खानने दोघे वेगळे झाल्याचा दावा केला आहे. केआरकेने एनिवर्सरीच्या दिवशी 22 डिसेंबरला एक पोस्ट केली. त्यात लिहिलं की, “मला सुरुवातीपासून माहित होतं की, चहल आणि धनश्रीच लग्न फारकाळ टिकणार नाही. आता दोघे वेगळे झालेत”

सोशल मीडियावरुन काय संकेत मिळाले?

केआरकेने जे म्हटलय त्यात किती तथ्य आहे, हे कळणं कठीणच आहे. पण धनश्री आणि चहलच्या मागच्या काही महिन्यातील सोशल मीडियावरील सक्रीयतेवरुन या दाव्याला बळ नक्कीच मिळतं. काही महिन्यापूर्वी चहल आणि धनश्री परस्परासोबत फोटो पोस्ट करायचे. स्टोरी शेअर करायचे. पण मागच्या काही आठवड्यांपासून दोघांची एकही एकत्र पोस्ट आलेली नाही. धनश्रीने चहलसोबत 25 ऑगस्टला शेवटचा फोटो पोस्ट केलेला. त्यानंतर चहलने 27 सप्टेंबरला धनश्रीच्या वाढदिवसाला फोटो पोस्ट करुन शुभेच्छा दिलेल्या.

तो एकटा असल्याचे संकेत

इतकच नाही, चहलने मागच्या काही दिवसात त्याच्या इन्स्टाग्रामवर अशा काही पोस्ट केल्यात, त्यातून तो एकटा असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानंतर दोघांनी अनेक फोटो पोस्ट केलेत. पण दोघेही कुठे एकत्र दिसलेले नाहीत. धनश्रीने चहलच्या कुठल्याही फोटोवर Reaction दिलेली नाही. चहलने सुद्धा मागच्या महिन्याभरात धनश्रीच्या एकाही फोटोला लाइक केलेलं नाही. आता यामध्ये सत्य काय? हे ते जोडपच सांगू शकेल.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.