5

England Tour India | विराटला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

England Tour India | विराटला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 6:57 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला (England Tour India) सुरुवात होत आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ चेन्नईमध्ये (Chennai) क्वारंटाईन आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुल, इशांत शर्मा, हार्दिक पंड्या आणि कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) संघात पुनरागमन झालं आहे. या कसोटी मालिकेत विराट कोहलीला एका दिग्गज माजी कर्णधाराचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विराटला वेस्टइंडिजचे माजी कर्णधार सर क्लाईव्ह लॉईड (Sir Clive Lloyd) यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (team india captain virat kohli have chance to break clive lloyd record against england )

काय आहे विक्रम?

कर्णधार म्हणून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. विराटला लॉईड यांना पछाडण्यासाठी अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे. लॉईड यांनी कर्णधार म्हणून 5 हजार 233 धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावावर कसोटीमध्ये कर्णधार म्हणून  5 हजार 220 धावांची नोंद आहे. यामुळे या 14 धावा करताच विराट लॉईड यांना पछाडेल. तसेच विराट या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहचेल.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार

ग्रॅमी स्मिथ – 8 हजार 659 धावा

एलन बॉर्डर – 6 हजार 623 धावा

रिकी पोंटिंग- 6 हजार 542 धावा

क्लाइव् लॉयड 5 हजार 233 धावा

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत कोहलीला धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची ‘विराट’ संधी

India vs England | अश्विनला इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत विक्रमाची संधी, ठरणार चौथा भारतीय

(team india captain virat kohli have chance to break clive lloyd record against england )

Non Stop LIVE Update
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...