
भारताचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहलीचा जगातील बेस्ट फलंदाजांमध्ये समावेश होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने आतापर्यंत टीम इंडियाकडून खेळताना दमदार प्रदर्शन केलय. मैदानावर कोहलीचे शॉट्स क्लासिक श्रेणीतले असतात. अलीकडेच टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीबद्दल एक मोठं वक्तव्य केलय. द्रविड कोहलीच्या हाईटबद्दल बोलले. ते ऐकून फॅन्स हैराण झाले. उंचीमध्ये कोहली छोटा आहे, असं राहुल द्रविड म्हणाले.
राहुल द्रविडने आशीष कौशिकसोबत पॉडकास्टमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं. “गावस्कर एक बॅलेन्स खेळाडू होते.
त्यांना मी नेहमी फलंदाजी करताना पाहिलय. माझी उंची त्यांच्यापेक्षा थोडी उंच होती. म्हणून मी कधी त्यांना कॉपी केलं नाही. सचिन तेंडुलकर सुद्धा बॅलन्स खेळाडू होता. छोट्या उंचीच्या लोकांना फलंदाजीमध्ये जास्त फायदा असतो” असं राहुल द्रविड म्हणाले. “मागच्या काही वर्षात असे अनेक धाकड फलंदाज आहेत, ज्यांची उंची छोटी होती. तुम्ही सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉटिंगकडे पाहू शकता. सर डॉन ब्रॅडमन यांची उंची सुद्धा छोटी होती. विराट कोहली सुद्धा उंचीमध्ये छोटा आहे. कोहलीला हे अजिबात आवडणार नाही की, मी त्याला छोटा बोललो” असं राहुल द्रविड म्हणाला.
फिजिक्सही तुम्हाला हेच सांगेल
“आजच्या काळात क्रिकेट वेगाने बदलतय. फलंदाजांना सतत सिक्स माराव्या लागतात. उंच खेळाडूंकडे फायदा असतो, ते कुठल्याही चेंडूवर सिक्स मारु शकतात. फिजिक्सही तुम्हाला हेच सांगेल. केविन पीटरसन, कायरन पोलार्ड या फलंदाजांकडे तुम्ही पाहू शकता खासकरुन T20 क्रिकेटमध्ये” असं द्रविड म्हणाले.
76 धावांची मॅचविनिंग इनिंग
राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 2024 साली icc T20 वर्ल्ड कप जिंकलेला. या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवलेला. 2007 नंतर दुसऱ्यांदा t20 वर्ल्ड कप जिंकलेला. या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली सुद्धा होता. त्याने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळलेली. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने आपले सर्व सामने जिंकलेले.