Vaibhav Sooryavanshi : बॅटिंगने बॉलर्सवर दहशत निर्माण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मिळाली मोठी जबाबदारी, 14 नोव्हेंबरपासून नव्या रोलमध्ये

Vaibhav Sooryavanshi : भारताय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला नवीन जबाबदारी मिळाली आहे. वैभव आपल्या फलंदाजीने समोरच्या टीमची गोलंदाजी उद्धवस्त करण्यासाठी ओळखला जातो. सध्या तो नियमित टीम इंडियाचा भाग बनला आहे.

Vaibhav Sooryavanshi : बॅटिंगने बॉलर्सवर दहशत निर्माण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मिळाली मोठी जबाबदारी, 14 नोव्हेंबरपासून नव्या रोलमध्ये
Vaibhav Sooryavanshi
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 06, 2026 | 8:16 PM

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याला बिहारच्या सीनियर क्रिकेट टीमचं कॅप्टन बनवण्यात आलं आहे. पहिल्यांदा वैभव सीनियर टीमचा कॅप्टन बनला आहे. 14 नोव्हेंबरपासून सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सुरु होणार आहे. सुरुवातच्या दोन सामन्यांसाठी 17 सदस्यीय टीमचं नेतृत्व वैभवकडे सोपवण्यात आलं आहे. सूरज कश्यपला टीमचं उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी टीमची घोषणा केली आहे. बिहार येत्या 14 नोव्हेंबरला आपला पहिला सामना सौराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. इंदूरमध्ये ही लढत होईल.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहार ग्रुप बी मध्ये आहे. या ग्रुपमध्य दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, रेल्वे, सौराष्ट्र आणि तामिळनाडूच्या टीम्स आहेत. सौराष्ट्र विरुद्ध सामन्याने बिहार या स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. वैभव सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी टीमचा कॅप्टन आहे.

Loading...

IPL 2026 मध्ये किती धावा केल्या?

वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा भाग आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव दमदार प्रदर्शन केलं. टुर्नामेंटमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. वैभवने 16 सामन्यात 776 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 237 पेक्षा जास्त होता. वैभव सध्या टीम इंडियाकडून टी20 इंटरनॅशनल क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत दहा टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध शानदार फलंदाजी

वैभव अंडर19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 80 चेंडूत तुफानी 175 धावांची इनिंग खेळला होता. त्याच्या इनिंगच्या बळावर भारताने फायनलमध्ये 100 धावांनी विजय मिळवला होता. न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्याय वैभवने शानदार फलंदाजी केली. त्याने 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने अभिषेक शर्मासोबत 133 धावांची भागीदारी केली होती.

बिहारची टीम

बिहारची टीम : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आलोक कुमार, आयुष लोहारुका (विकेटकिपर), अल्तमश अशरफ, परम कुमार सिंह, अनमोल कुमार (विकेटकीपर), ऋत्विक राज, सूरज कश्यप (उपकर्णधार), मयंक कुमार, राघवेंद्र प्रताप, आशीष कुमार, वासुदेव प्रताप सिंह, मोहम्मद इजहार, अमोद यादव, प्रशांत सिंह, नवाज खान आणि हिमांशु सिंह

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us