IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ खेळणार आणखी एक सामना, तारीख जाणून घ्या…
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु होणार आहे. आता या कसोटी मालिकेपूर्वीही भारतीय संघ एक सामना खेळणार आहे. तर हा सामना का खेळणार आहे यामागचे कारण जाणून घ्या...

पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे, कोणते खेळाडू खेळतील आणि कोणाला वगळले जाईल हे स्पष्ट केले आहे. एका नवीन खेळाडूलाही संघात सामील केले आहे. सारांश जैन या नवीन खेळाडूचे नाव आहे. इतकेच नाही, तर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संध एक सामना खेळणार आहे. भारतीय संघ एक सराव सामनाही खेळणार आहे. याचीही घोषणा करण्यात आली असून, सामन्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. शुभमन गिल पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल आणि केएल राहुल उपकर्णधार असेल.
ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून, तिथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्ट रोजी सुरू होऊन 19 ऑगस्टपर्यंत चालेल, तर दुसरा सामना 23 ऑगस्ट रोजी सुरू होईल. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून खेळवली जाईल, जिथे भारतीय संघ गुणतालिकेत खूप खालच्या क्रमांकावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही मालिका जिंकून भारताला गुणतालिकेत पुढे जाण्याची संधी मिळेल. हे काम सोपे नसेल; श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खूप मजबूत खेळतो आणि त्यांना तिथे हरवणे सोपे नाही.
दरम्यान, बीसीसीआयने मालिकेसाठी संघाची घोषणा केली. तसेच, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ चार दिवसांचा सराव सामना खेळेल, असेही सांगण्यात आले. हा सामना 7 ऑगस्ट रोजी सुरू होईल. चार दिवसांचा सामना असल्याने तो 10 ऑगस्ट रोजी संपेल. हा सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. या सामन्यामुळे भारतीय संघाला आपल्या तयारीचे मूल्यांकन करण्याची आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळेल.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.