नितीश रेड्डी आऊट तर ‘जम्मू कश्मीर एक्सप्रेस’चं पदार्पण… अखेर वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला डेब्यू, Playing Xi पाहा…
IND vs WI 2nd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु असून दुसरा सामना सध्या खेळला जात आहे. या सामन्यात एका नवीन खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. आता दुसरा सामना हा आज खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता आजच्या सामन्यातही कर्णधार शुभमन गिलने एका खेळाडूला पदार्पण दिले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने आकिब नबीला पदार्पणाची कॅप प्रदान केली. यासह, टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचे आकिब नबीचे स्वप्न साकार झाले आहे. टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आकिब नबी हा जम्मू आणि काश्मीरमधील तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी परवेझ रसूल आणि उमरान मलिक यांनी ही कामगिरी केली आहे. आकिबला संघात संधी मिळाली आहे तर नितीश कुमार रेड्डीला डच्चू देण्यात आला आहे.
View this post on Instagram
आकिब नबीचा टीम इंडियामध्ये समावेश त्याच्या चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यामुळे मिळाला आहे. तो चेंडू सीम करण्यातही पारंगत आहे. त्याच्याकडे मोहम्मद शमीसारखी कौशल्ये आहेत. आकिब नबी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतो, त्याचबरोबर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकिब नबी फलंदाजीही करू शकतो. खालच्या फळीतील त्याची फटकेबाजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. जर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आकिब नबीची निवड झाली, तर त्याला तिथल्या खेळपट्ट्याही आवडू शकतात.
View this post on Instagram
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील आकिब नबीचे वडील गुलाम नबी दार हे शिक्षक आहेत. मुलाने डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, आकिबला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड असल्यामुळे त्याने कधीच अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले नाही. सुरुवातीच्या काळात क्रिकेटचे स्पाइक्स खरेदी करण्यासाठीही त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याला अनेकदा मित्रांकडून बूट उसने घ्यावे लागायचे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, रवींद्र जडेजा, आकिब नबी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन: जॉन कॅम्पबेल, कीस कार्टी, शाई होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अमीर जांगू, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शमारह जोसेफ, जेडेन सील्स, विटेल लॉज.
