Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार खेळीनंतर कोहलीचा खुलासा, म्हणाला…
सामना संपल्यानंतर ही बाब विराट कोहलीने बोलून दाखवली.

काल झालेल्या हैदराबादमधील (Hydrabad) सामन्यात अंतिम मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम (Australia) पराभूत झाली. टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा विजय झाला. पण दुसरीकडे गोलंदाजांना अपयश आल्याने मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. कारण पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सध्याच्या टीममधील अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
?️?️ I am enjoying my process at the moment: @imVkohli
Scorecard ▶️ https://t.co/xVrzo737YV #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/7JlLTyDj6y
— BCCI (@BCCI) September 25, 2022
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या टीमने चांगली धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. त्यामुळे गोलंदाजांवरती जोरदार टीका सुरु होती. आशिया चषकात सुद्धा खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला बाहेर पडावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाकडून उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग रोहित शर्मा आणि केएल राहूल पटकन बाद झाले. त्यावेळी टीम इंडिया ही मॅच जिंकेल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.
सुर्यकुमार यादव मैदानात आल्यानंतर विराट कोहली त्याच्या पद्धतीने खेळत होता. परंतु सुर्यकुमार यादवने काल वादळी खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे टीम इंडियाला विजयासमीप जाता आले.
सुर्यकुमार यादवचे शॉट पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि राहूल द्रविड या दोघांनी विराट कोहली शांत खेळण्याचा सल्ला दिला. कारण एका बाजूने जोरदार धावा निघत होत्या, दुसरी बाजू फक्त विराट कोहलीला संभाळून घ्यायची होती.
सामना संपल्यानंतर ही बाब विराट कोहलीने बोलून दाखवली.
