विराट कोहलीकडून या 5 गोष्टी शिकायलाच हव्या!!

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने, 24 ऑक्टोबरला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात, वन डे कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. केवळ 205 डावांत कोहलीने हा मैलाचा दगड पार केला. सर्वात जलद दहा हजार धावा करणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. यशाचं दुसरं नाव म्हणजे कोहली असं समीकरण बनलं आहे, मात्र त्याला इथवर पोहोचण्यासाठी अनेक […]

विराट कोहलीकडून या 5 गोष्टी शिकायलाच हव्या!!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने, 24 ऑक्टोबरला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात, वन डे कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. केवळ 205 डावांत कोहलीने हा मैलाचा दगड पार केला. सर्वात जलद दहा हजार धावा करणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. यशाचं दुसरं नाव म्हणजे कोहली असं समीकरण बनलं आहे, मात्र त्याला इथवर पोहोचण्यासाठी अनेक खडतर टप्पे पूर्ण करावे लागलेत. विराटच्या यशामागील 5 रहस्य

प्रचंड मेहनत

विराट कोहलीच्या मेहनतीला तोड नाही. कोहली आज जिथे पोहोचला आहे, त्यामागे त्याची प्रचंड मेहनत आहे. त्याचा फिटनेस असो की खेळातील सुधारणा, त्यासाठी कोहलीने घेतलेल्या प्रचंड मेहनतीचं योगदान आहे.

कडक शिस्त

कोहली जितका मेहनती आहे, तितकाच तो शिस्तप्रिय आहे. ज्या मेहनतीने कोहलीने यश साध्य केलं आहे, त्या मेहनतीला कोहलीने शिस्तीची साथ दिली आहे. व्यायाम असो किंवा आहार, कोहलीने सर्व काही शिस्तीने पाळलं आहे. कोहली कधीच जंक फूड खात नाही. आहारावर त्याचं संपूर्ण नियंत्रण आहे. फिटनेस बाबतीत तो सतर्क आहे. त्यामुळेच भारतीय संघातील तो सर्वात फिट खेळाडू आहे.

उत्साह

विराट कोहली जे काही करतो ते झोकून देऊन, मन लावून आणि प्रचंड उत्साहाने करतो. व्यायामाने कोहली उत्साहित राहतो. त्याला क्रिकेटवर प्रेम आहे, त्यामुळे क्रिकेटसाठी तो हवं ते सर्व करतो. बॅटिंग करताना जो उत्साह असतो, तोच उत्साह फिल्डिंगवेळीही पाहायला मिळतो. अन्य खेळाडूंच्या तुलनेत कोहलीचा उत्साह एक पाऊल पुढचाच असतो.

जबाबदारीची जाणीव

विराट कोहली जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा करोडो भारतीयांचा विश्वास त्याच्यावर असतो. हे जबाबादारीचं ओझं घेऊन कोहली मैदानात उतरत असला, तरी तो त्याच जबाबदारीने आपलं काम करतो. त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहता, त्याने आपली जबाबदारी सार्थपणे पार पाडल्याचं दिसून येतं.

वेळेचं नियोजन

विराट कोहली कडक शिस्तीचा असण्याचं कारण म्हणजे त्याचं वेळेचं नियोजन. वन डे, टी ट्वेण्टी आणि कसोटी या तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी स्वत:ला फिट ठेवावं लागतं. त्यातच अखंडित दौरे, मालिका यामुळे टाईमटेबल व्यस्त असतं. पण या वेळेचं योग्य नियोजन करुन, कोहलीने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.