Tokyo Olympics 2020 Live: भारतीय महिला संघाच्या पराभवाने दिवसाचा शेवट, कांस्य पदकाची आशा मात्र कायम

| Updated on: Aug 04, 2021 | 6:10 PM

Tokyo Olympics 2020 Live updates टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी बरेच महत्त्वाचे सामने असून यामध्ये बॉक्सर लवलीना आणि महिला हॉकी संघाचा सेमीफायनलचा सामना सर्वात महत्त्वाचा आहे.

Tokyo Olympics 2020 Live: भारतीय महिला संघाच्या पराभवाने दिवसाचा शेवट, कांस्य पदकाची आशा मात्र कायम
भारतीय महिला हॉकी संघ

भारतासाठी आजचा (4 ऑगस्ट) दिवस टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. दिवसाची सुरुवात नीरज चोप्राने भाला फेकच्या फायनलमध्ये पोहचत केली आहे. कुस्तीपटू रवि दहियाने सेमीफायनलमध्ये विजय मिळवत फायनल गाठली आहे. ज्यामुळे त्याला किमान रौप्य पदक पक्के झाले. मात्र दीपक पूनिया सेमीफायनलमध्ये पराभूत झाला आहे. दुसरीकडे बॉक्सर लवलीना बोरहोगेन सेमीफायनलमध्ये पराभूत झाली असून बॉक्सिंगच्या नियमांनुसार तिला कांस्य पदक मिळाले आहे. पुरुष हॉकी संघाच्या पराभवानंतर आज महिला संघ देखील सेमीफायनलमध्ये अर्जेंटीना संघाकडून 2-1 ने पराभूत झाला आहे. पण दोघांकडे अजूनही कांस्य पदक मिळवण्याची संधी आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Aug 2021 05:26 PM (IST)

    भारतीय महिलांची पदकाची आशा कायम

    भारतीय महिला हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये अर्जेंटीनाने पराभूत केल्यामुळे संघाच्या सुवर्णपदकासह रौप्य पदकाच्या आशा मावळल्या आहेत. पण कांस्य पदकाच्या आशा अजूनही कायम आहे. यासाठी भारतीय महिलांना ग्रेट ब्रिटेनसोबत 6 ऑगस्ट रोजी सामना खेळावा लागेल. दुसरीकडे भारतीय पुरुष 5 ऑगस्ट रोजी जर्मनी संघासोबत कांस्यपदकासाठी भिडणार आहेत. 

  • 04 Aug 2021 04:52 PM (IST)

    महिला हॉकी – चौथ्या आणि अंतिम डावाला सुरुवात

    भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सेमीफायनलचा सामना चांगलाच रंगला असून अर्जेंटीना संघाला पहिला एका गोलची आघाडी मिळाली आहे. सध्या शेवटच्या आणि चौथ्या डावाला सुरुवात झाली आहे.

  • 04 Aug 2021 04:36 PM (IST)

    महिला हॉकी - अर्जेंटीना संघाचा दुसरा गोल

    सततच्या आक्रमनानंतर अर्जेंटीना संघाला 36 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर दुसरा गोल मिळाला आहे. त्यामुळे अर्जेंटीना संघाने सामन्यात 2-1 ची आघाडी घेतली आहे.

  • 04 Aug 2021 04:15 PM (IST)

    महिला हॉकी - सामन्यात मध्यांतर दोन्ही संघ बरोबरीत

    सामन्यात भारत आणि अर्जेंटीना दोन्ही संघानी एक-एक गोल करत सामन्यात बरोबरी साधली आहे. सामन्यात हाफ टाईम झालं असून सामन्यात दोन्ही संघ अटीतटीचा खेळ करत आहेत.

  • 04 Aug 2021 04:01 PM (IST)

    महिला हॉकी - अर्जेंटीना संघाचे पुनरागमन

    सामना सुरु होताच दुसऱ्या मिनिटाला भारताच्या कौरने गोल केला होता. त्यानंतर आता 18 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या नोईलने एक गोल करत सामन्यात बरोबरी साधली आहे.

  • 04 Aug 2021 03:32 PM (IST)

    रेसलिंग - दीपक पूनिया पराभूत

    एकीकडे भारताचा कुस्तीपटू रवि दहिया अंतिम सामन्यात पोहचला आहे. मात्र भारताचा दुसरा कुस्तीपटू दीपक पूनिया 86 किलो ग्राम वजनी गटात सेमीफायनलमध्ये अमेरिकेच्या टेलरकडून पराभूत झाला आहे. 10-0 ने टेक्निकल सुपरियोरिटीच्या जोरावर टेलरने विजय मिळवला आहे. दीपक आता कांस्य पदकासाठी सामना खेळेल.

  • 04 Aug 2021 03:06 PM (IST)

    रेसलिंग – रवि दहिया सेमीफायनलमध्ये विजयी, फायनलमध्ये धडक

    भारताचा युवा कुस्तीपटू रवि दहियाने 57 किलोग्राम वर्गात आपला सेमीफायनलचा सामना खेळला. त्याने काजाकिस्तानच्या सानायेव नुरिस्लम याला पराभूत करत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. यामुळे भारताचे किमान रौप्य पदक पक्के झाले आहे.

  • 04 Aug 2021 02:38 PM (IST)

    कांस्य पदक जिंकल्यानंतर लवलिनाची प्रतिक्रिया

    कांस्य पदक पटकावत बॉक्सर लवलीना बोरगोहेन आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आठ वर्षांपासूनची ही मेहनत आहे. आता 2012 नंतर पहिल्यांदाच मी सुट्टी घेऊन आनंद साजरा करणार.

  • 04 Aug 2021 01:46 PM (IST)

    महिला गोल्फ- अदिति अशोक दुसऱ्या स्थानावर

    पहिल्या राउंडनंतर भारताची गोल्फर अदितिने 67 गुण मिळवत दुसरं स्थान पटकावलं आहे.  आणखी तीन राउंड शिल्लक असून त्यानंतर पदक कोणाला मिळणार हे कळणार आहे.

  • 04 Aug 2021 12:38 PM (IST)

    लवलीनाचं कांस्य पदक, गावकऱ्यांना गिफ्ट

    लवलीनाने भारताला ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिल्याने देशभरात आनंदाच वातावरण आहे. आसाम सरकारने देखील मागील अनेक वर्ष रखडलेल्या लवलीनाच्या गावापर्यंत रस्ता बनवण्याचे काम जोमात सुरु केले आहे.

  • 04 Aug 2021 12:08 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी दिल्या लवलिनाला शुभेच्छा

    भारतीय महिला बॉक्सर सेमीफायनलमध्ये पराभूत झाली. मात्र कांस्य पदक पटकावल्याने तिचे देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील तिच्या हिमतीची दाद देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 04 Aug 2021 11:23 AM (IST)

    बॉक्सिंग – लवलीना सेमीफायनलमध्ये पराभूत

    लवलीना आणि सुरमेनेली यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला. लवलीनाच्या प्रशिक्षकांनी तिला लांबून पंच करण्यास सांगितले. पण टर्कीच्या बॉक्सरने काही उत्तम पंचेसच्या मदतीने दुसरा राउंडही जिंकला. अखेर सामना लवलिनाच्या हातातून निसटल्याने ती फायनलमध्ये जाऊ शकली नाही. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

  • 04 Aug 2021 11:16 AM (IST)

    बॉक्सिंग – लवलीना पहिल्या राउंडमध्ये पराभूत

    पहिल्या राउंडमध्ये टर्कीच्या खेळाडूने लवलिनाला 5-0 ने पराभूत केलं आहे. 

  • 04 Aug 2021 11:14 AM (IST)

    बॉक्सिंग - लवलिनाचा सेमीफायनलचा सामना सुरु

    भारताची बॉक्सर लवलिना आणि टर्कीच्या सुमरनेली यांच्यात सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही खेळाडू एकमेकींना तगडी टक्कर देत आहेत.

  • 04 Aug 2021 09:56 AM (IST)

    रेसलिंग – रवि दहियाचा सेमीफायनल प्रवेश

    रवि दहियाने 14-4 च्या फरकाने क्वॉर्टरफायनलचा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. रवि पदक मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

  • 04 Aug 2021 09:53 AM (IST)

    रेसलिंग – दीपक पूनियाही 12-1 ने विजयी

    रवि दहिया पाठोपाठ भारताचा दुसरा कुस्तीपटू दीपक पूनियाही उत्कृष्ट विजय मिळवत पुढच्या फेरीत पोहचला आहे. त्याने नाइजेरियाच्या कुस्तीपटूला 12-1 ने मात दिली.

  • 04 Aug 2021 09:36 AM (IST)

    रेसलिंग – सलामीच्या सामन्यात रवि दहिया 13-2 ने विजयी

    भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने सलामीच्या सामन्यात अप्रतिम विजय मिळवत उत्तम सुरुवात केली आहे. सामन्यात त्याने पहिल्या ब्रेकपर्यंत 9-2 ने आघाडी मिळवली होती. ज्यानंतर 11-2 आणइ अखेर 13-2 असा स्कोर करत सामना खिशात घातला.

  • 04 Aug 2021 09:35 AM (IST)

    रेसलिंग – अंशु 2-8 ने पराभूत

    भारताची महिला कुस्तीपटू अंशु ओलिम्पिकच्या पहिल्या सामन्यातच पराभूत झाली. तिला इरिना हिने 2-8 ने मात दिली.

  • 04 Aug 2021 09:33 AM (IST)

    भाला फेक – शिवपाल सिंह फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी

    नीरज चोप्रानंतर मैदानावर आलेला शिवपाल सिंहम मात्र भाला फेकच्या फायनलमध्ये पोहचू शकलना नाही. त्याचे तिन्ही प्रयत्नातील 74.81 मीटर हेच सर्वोत्कृष्ट अंतर असल्याने तो पुढील फेरीत प्रवेश करु शकला नाही.

  • 04 Aug 2021 09:31 AM (IST)

    भाला फेक - नीरच चोप्राचा ऐतिहासिक थ्रो

  • 04 Aug 2021 09:30 AM (IST)

    भाला फेक – नीरज चोप्राने एकाच थ्रोमध्ये केले अनेक रेकॉर्ड

    ऑलिम्पकच्या फायनलमध्ये जागा मिळवणारा नीरज भारताचा पहिला खेळाडू बनला आहे. तर  ओलिम्पिकच्या  एथलेटिक्स स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा मिळवणारा 12 वा भारतीय बनला आहे.

  • 04 Aug 2021 09:28 AM (IST)

    भाला फेक– नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्ना मिळवली फायनलमध्ये जागा

    नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्ना 86.65 मीटर लांब भाला फेकला. त्याच्या थ्रोनंतर प्रशिक्षकांसह सर्वच भारतीय स्टाफ आनंदी होता. पहिल्याच प्रयत्ना अपेक्षित अंतर पार केल्याने त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.  

Published On - Aug 04,2021 9:25 AM

Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.