AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल’, उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीत भाजपवर घणाघात

"अटलजींचा आत्मा वरुन रडत असेल. ते बोलले होते की, अशी सत्ता मला मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. नाकार्तांच्या हातामध्ये भाजप पक्ष गेला आणि भाजप पक्ष संपवून टाकला", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

'अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल', उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीत भाजपवर घणाघात
उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 28, 2024 | 9:01 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. “कोकणामध्ये प्रचार करायची गरज आहे का? मग थांबू इकडेच? मी मुद्दाम आलो. कारण मला कल्पना आहे, कोकण हे शिवसेना आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत, वैभव नाईक, राजन विचारे आहेत, तुम्ही सगळे जण आहात. मला तुमचा अभिमान आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही जागच्या जागी उभे आहात. हा डाव कसा आहे ते बघा. एकतर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं. गद्दारीची पूर्ण तंगडदोड केली, जागा कापल्या. उमेदवार बदलले”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“तुम्ही इतके वर्षानुवर्षे जीवापाड जपलेला धनुष्यबाण चोरला आणि कोकणात तो सुद्धा गायब करुन टाकला. म्हणजेच काय त्या लाचाऱ्यांना, खोक्यात जे बसले आहेत, हे गद्दारांचे दिल्लीत जे दोन मालक बसले आहेत ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघाले आहेत. त्यांना माहिती नाही अजून की, कोकणात जांबा दगड आहे. हा जांबा दगड एकेकाळी लाव्हारस होता. याचा अर्थ असा नाही तो पुन्हा लाव्हा होणार नाही. आज संपूर्ण कोकणात नाही, आख्ख्या महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात लाव्हारस उसळून आला आहे. मोदींना अजून काही तो सूरच लागत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आता त्या छातीमधील हवा गेली’

“सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. मॅच बघताना, पंचायत होते की, हा खेळाडू आपल्याकडे होता, तर नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता तिकडे गेला. तसं आता भारताच्या राजकारणात झाला. आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटीकल लीग असंच झालं आहे. मोदी काहीही बोलतील, पण त्यांना आधी 2019 आणि 2014 चा आत्मविश्वास दिसत नाही. आपण फसलो होतोच. मोदींचा आधी काय रुबाब होता? कारण शिवसेना सोबत होती. त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सबपे भारी. अशी मस्ती होती. छाती छप्पन इंचाची होती. आता त्या छातीमधील हवा गेली. एक अकेला सब पे भारी आणि आजूबाजूला सब भ्रष्टाचारी”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल’

“अटलजींचा आत्मा वरुन रडत असेल. ते बोलले होते की, अशी सत्ता मला मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. नाकार्तांच्या हातामध्ये भाजप पक्ष गेला आणि भाजप पक्ष संपवून टाकला. अरे शिवसेना आख्खी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात कितीवेळा यावं लागलं होतं? कारण आख्खी शिवसेना त्यांच्यासोबत होती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.