वर्ल्ड कपमध्ये दिसणार ‘हे’ 12 महागडे पंच, पगार किती?

वर्ल्ड कपमध्ये दिसणार 'हे' 12 महागडे पंच, पगार किती?

मुंंबई : क्रिकेट म्हणजे अनेकांचा आवडता खेळ. भारतासह संपूर्ण जगात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते आहेत. तसेच क्रिकेटपटूंचेही अनेक चाहते आहेत. आपण बऱ्याचदा या क्रिकेटपटूंबद्दल त्यांच्या लाईफस्टाईल, कुटुंब किंवा त्यांच्या कमाईपर्यंतच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. क्रिकेटपटूंची कमाईही कोटींच्या घरात असते. पण कधी क्रिकेटमधील पंचाची कमाई किती आहे, तुम्हाला माहित आहे का?, आज आपण याच पंचाच्या कमाईबद्दल जाणून घेणार आहोत.

क्रिकेटमध्ये पंचाची भूमिका सर्वात महत्त्वाची समजली जाते. त्यांचा एक चुकीचा निर्णय संघाचा पराभव आणि विजयाचा निर्णय बदलू शकतो. यासाठी आयसीसी (International Cricket Council)  पंचांची निवड करताना खूप सतर्कतेने करते. क्रिकेट वर्ल्डकप 2019 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाच्या वर्ल्डकपसाठी आयसीसीने 12 पंचाची निवड केली आहे.

आलीम डार

पाकिस्तानसाठी 17 प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारे आलीम डार यांना जगातील सर्वात उत्कृष्ट पंचांपैकी एक म्हणून ओळखले जाते. डार यांनी वयाच्या 31 व्या वर्षात पंच म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून करिअरला सुरुवात केली. त्यांनी 2003, 2007 आणि 2011 च्या वर्ल्डकपमध्येही तसेच इतर मोठ्या स्पर्धांमध्येही पंच म्हणून काम केलं आहे. आलीम डार पाकिस्तानमधील पहिले पंच आहेत, ज्यांना अॅमिरेट्स अॅलीट पंचाच्या पॅनलमध्ये ठेवण्यात आलं आहे. डार यांना 2009 आणि 2010 असे सलग दोन वर्ष ‘अंपायर ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

डार यांना कसोटीत पंच म्हणून 2 लाख 10 हजार  874 हजार रुपये, टी 20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 1 लाख 64 हजार 641 रुपये वेतन मिळते. याशिवाय त्यांना वर्षाला 31 लाख 63 हजार 117 रुपये दिले जातात.

नाईलेज लॉन्ग

जगातील सर्वात उत्कृष्ट आणि महागडा पंच म्हणून नाईलेज लॉन्ग यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. नाईलेज लॉन्ग यांना कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये , टी-20 सामन्यासाठी 70 हजार 291 रुपये आणि वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 1 लाख 54 हजार 641 रुपये वेतन मिळते. याशिवाय त्यांना वर्षाला 31 लाख 63 हजार 117 रुपये दिले जातात.

लॉन्ग हे सुरुवातीला डाव्या हाताने फलंदाजी करायचे आणि ऑफ स्पिन गोलंदाज होते. त्यांनी 2002 मध्ये पंच म्हणून करिअरला सुरुवात केली.

पॉल रिफेल

पॉल रिफेल 1999 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमचे सदस्य होते. त्यांनी 2004-05 मध्ये पंच म्हणून कामाला सुरुवात केली. रिफेल यांचा 2005-06 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया नॅशनल पंचाच्या पॅनलमध्ये समावेश करण्यात आला. यानंतर फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून कामाला सुरुवात केली.

रिफेल यांनी आयसीसीकडून कसोटी सामन्यांसाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यासाठी 70 हजार रुपये 291 आणि आंतरराष्ट्रीय वनडे 1 लाख 54 हजार 641 रुपये वेतन मिळते. याशिवाय त्यांना वर्षाला 31 लाख 63 हजार 117 रुपये दिले जातात.

क्रिस गफाने

जगातील सुप्रसिद्ध पंच म्हणून आजही क्रिस गफ यांचे नाव घेतलं जाते. एक क्रिकेटर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 83 सामने खेळले. यानंतर त्यांनी 113 लिस्ट ए आणि ओटागोसाठी 8 टी 20 सामनेही ते खेळले आहेत. यानंतर त्यांनी 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कामाला सुरुवात केली.

क्रिस यांना कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये त्यांना 70 हजार 291 रुपये दिले आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते. याशिवाय त्यांना वार्षिक 31 लाख 63 हजार 117 रुपये दिले जातात

इयान गूल्ड

इंग्लंडचे माजी क्रिकेटर आणि पंच इयान गूल्ड हे एक उत्कृष्ट पंच म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 1983 मध्ये विकेटकीपर म्हणून एक सामना खेळला होता. गूल्ड यांना फुटबॉलही खेळायला आवडते. त्यांनी स्लू टाऊन आणि आर्सेनलसाठी गोलकीपर म्हणून भूमिक बजावली आहे.

गूल्ड यांना कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतम मिळते. याशिवाय त्यांना वार्षिक 24 लाख 60 हजार 202 रुपये दिले जातात.

कुमार धर्मसेना

श्रीलंकाचे माजी क्रिकेटर आणि आयसीसीच्या अॅलिट पॅनलमध्ये कुमार धर्मसेनाने पंच म्हणून काम करायला सुरुवात 2009 मध्ये केली. श्रीमंत पंच म्हणून धर्मसेना त्यांची ओळख आहे. त्यांना आयसीसीकडून वर्षाला 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते.

याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि  आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतम मिळते.

रिचर्ड इलिंगवर्थ

वोस्टरशायर, डर्बीशायर आणि नेटालसाठी देशातंर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रिचर्ड इलिंगवर्थचा 2006 मध्ये ईसीबी (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) ने पंचाच्या यादीत समावेश केला. यानंतर 2009 मध्ये त्यांना प्रमोशन मिळाले आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये समावेश करण्यात आला.

आयसीसीकडून रिचर्ड यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते.

रिचर्ड केटलबरो

रिचर्ड केटलबरो यांनी यॉर्कशायर आणि मिडलसेक्ससाठी 33 क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यांनी 7 अर्धशतक आणि 1 शतकही केले आहे. पण ते आपला हा डाव पुढे घेऊन जाऊ शकले नाही आणि त्यांनी पंच म्हणून पुढे काम केलं आहे. इंग्लंड क्रिकेट क्लबने त्यांचा 2006 मध्ये पंचांच्या यादीत समावेश केला.

आयसीसीकडून रिचर्ड यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते.

ब्रुस ऑक्सेनफोर्ड

ब्रुस ऑक्सेनफोर्डही जगातील सर्वात श्रीमंत पंचाच्या यादीत मोडतात. ब्रुस यांनी 1991-1993 पर्यंत 8 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले आहेत. यानंतर 2001 मध्ये त्यांनी पंच म्हणून कामाला सुरुवात केली.

आयसीसीकडून ब्रुस यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते.

रॉड टकर

रॉड टकर जगातील प्रसिद्ध पंचापैकी एक आहेत. न्यू साऊथ वेल्स आणि तस्मानियासाठी देशातंर्गत क्रिकेटमध्येही टकर खेळले आहेत. रॉड टकर यांनी 2009 मध्ये ऑस्ट्रेलियामधील टी 20 आणि वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून पहिल्यांदा काम केले आहे. आयसीसी टी20 मध्ये 2009 आणि 2010 सह आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2011 मध्येही त्यांना उत्कृष्ट पंच म्हणून सन्मानित केलं आहे.

आयसीसीकडून टकर यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते.

मराईस ईरास्मस

दक्षिण अफ्रिकी पंच म्हणून मराईस ईरास्मस यांना जगातील सर्वात उत्कृष्ट पंच म्हणून ओळखलं जाते. या कारणामुळे त्यांना 2019 वर्ल्डकपमध्ये पंच म्हणून निवडले आहे. मारईस ईरास्मस यांनी 1988-1996 च्या दरम्यान 53 फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत. यानंतर ऑगस्ट 2008 मध्ये त्यांचा आयसीसीच्या अॅलिट पॅनलमध्ये समावेश करण्यात आला. 2010 मध्ये त्यांचे काम पाहून त्यांना प्रमोशन देण्यात आले.

आयसीसीकडून मराईस यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते.

सुंदरम रवी

क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या 12 अॅलिट पंचांमध्ये एकमेव भारतीय पंच सुंदरम रवी यांचा समावेश करण्यात आला आहे. सुंदरम रवी यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली  आहे.

आयसीसीच्या अॅलिट पॅनलमध्ये समावेश करण्यात आलेले सुंदरम हे एस. व्यंकटराघवन नंतर दुसरे भारतीय आहेत. आयसीसीकडून सुंटरम रवी यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटीत सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 वेतन मिळते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI