Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

Vaibhav Sooryavanshi : तिरंगी मालिकेत अखेर वैभव सूर्यवंशीला सूर गवसला आहे. सिनियर टीम इंडियाकडून खेळण्याआधी वैभव सूर्यवंशी सध्या इंडिया ए कडून खेळतोय. पहिल्या सामन्यात श्रीलंका ए विरुद्ध वैभव अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने काही प्रमाणात आपल्या खेळात सुधारणा केली.

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..
Vaibhav Sooryavanshi
Image Credit source: Ashley Allen-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Jun 11, 2026 | 11:47 AM

आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची इंग्लंड आणि आयर्लंड विरूद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडियात निवड झाल्यानंतर इंडिया ए कडून पहिला सामना खेळताना वैभव सूर्यवंशीने निराश केलं होतं. श्रीलंका ए विरुद्ध वैभव सूर्यवंशी 12 चेंडूत 14 धावा करुन बाद झाला होता. या खेळीत त्याने तीन चौकार मारले होते. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे अनेक चाहते नाराज झाले होते. वैभव सूर्यवंशी एक प्रतिभावान खेळाडू आहे. आज अफगाणिस्तान ए विरूद्धच्या सामन्यात त्याच्या परफॉर्मन्सकडे सर्वांच लक्ष लागलेलं. वैभव सूर्यवंशीने आज निराश केलं नाही. श्रीलंका ए विरूद्धच्या सामन्याच्या तुलनेत त्याने आपल्या खेळात सुधारणा केली. वैभव आज अफगाणिस्तान विरुद्ध मोठी इनिंग खेळू शकला नाही. पण टीमला त्याने अपेक्षित स्टार्ट करुन दिली.

वैभवने 22 चेंडूत 44 धावा फटकावल्या. त्याची ही खेळी 9 चौकारांनी सजली. अब्दोल्लाह अहमदझाईच्या गोलंदाजीवर मोहम्मद इशाककडे झेल देऊन तो तंबूत परतला. पहिल्या विकेटसाठी त्याने प्रभसिमरन सिंहसोबत 74 धावांची भागीदारी केली. प्रभासिमरनने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. वैभव सूर्यवंशी ज्या स्टाइलचा फलंदाज आहे, त्यात त्याच्याकडून धुवाधार फलंदाजीच अपेक्षा असते. विकेटवर थांबून खेळणं ही त्याची स्टाइल नाही. क्रीजवर आल्यापासून फटकेबाजी ही वैभव सूर्यवंशीची ओळख आहे.

पहिल्या ओव्हरपासून वैभवला मूमेंटम मिळालं

आज अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यातही हेच दिसलं. अफगाणिस्तान ए विरुद्ध वैभवने बाऊंड्री मारुन सुरुवात केली. पहिल्या दोन चेंडूंवर त्याने लागोपाठ दोन चौकार मारले. अफगाणिस्तान ए विरुद्ध पहिल्या ओव्हरपासून वैभव सूर्यवंशीला मूमेंटम मिळालं. ज्याची त्याला गरज होती. सध्या सगळेच वैभव सूर्यवंशीच भरभरु कौतुक करतायत. पण टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने वैभव सूर्यवंशीला वास्तवाची जाणीव करुन दिली आहे. इंग्लंड आणि आयर्लंडमधली परिस्थिती वेगळी असेल. स्विंग होणारे चेंडू खेळणं भरपूर कठीण असतं असं सौरव गांगुलीने आधीच म्हटलं आहे.

परफॉर्मन्सच्या बळावर टीम इंडियात स्थान

वैभव सूर्यवंशी आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. यंदाचा आयपीएलचा सीजन त्याने खऱ्या अर्थाने गाजवला. समोर जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड असे टॉप क्लास बॉलर होते. पण वैभवने त्याची तमा बाळगली नाही. त्याने धुवाधार बॅटिंग केली. अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार खेचून त्याने क्रिकेट विश्वाला स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडला. परफॉर्मन्सच्या बळावर आज त्याने टीम इंडियात स्थान मिळवलं आहे.

 

Follow Us