AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KXIP vs RCB | ‘शॉर्ट रन’चा वाद विसरुन पंजाब मैदानात उतरणार, रॉयल चॅलेंजर्सशी भिडणार

आरसीबीमध्ये गोलंदाजीसाठी युजवेंद्र चहल नेहमीप्रमाणे महत्तपूर्ण भूमिका पार पाडेल. सोमवारी मिळालेल्या विजयात हा लेग स्पिनर महत्त्वाचा ठरला.

KXIP vs RCB | 'शॉर्ट रन'चा वाद विसरुन पंजाब मैदानात उतरणार, रॉयल चॅलेंजर्सशी भिडणार
| Edited By: | Updated on: Sep 24, 2020 | 6:23 PM
Share

दुबई : किंग्ज इलेव्हन पंजाबचा आज गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी सामना आहे (Kings XI Punjab VS Royal Challengers Bangalore). यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबचं लक्ष्य हे ‘शॉर्ट रन’च्या विवादास्पद निर्णयाला विसरुन त्यांचं खेळातील कौशल दाखवण्याचं असेल. दिल्ली कॅपिटल्सविरोधातील पहिल्या सामन्यात स्क्वेअर लेग अंपायरने चुकून 19 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस जॉर्डनच्या रनला ‘शॉर्ट रन’ म्हणून घोषित केलं. त्याचा परिणाम टीमला भोगावा लागला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला (Kings XI Punjab VS Royal Challengers Bangalore).

पंजाबच्या टीमने अंपायरच्या या निर्णयाविरोधात अपील केलं आहे. कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि कंपनी या घटनेला विसरुन आपलं लक्ष पुढील सामन्यांकडे वळवत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवून विजयी घौडदौड सुरू केली आहे.

तरुण खेळाडू देवदत्त पडिक्कल यांने अर्धशतक करत त्याच्या आपीएल करिअरची सुरुवात केली. सोमवारी विराट कोहली (Virat Kohli) आणि आरोन फिंच (Aaron Finch) दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये होते आणि आता ते मैदानात आणखी थोडा वेळ घालवण्यासाठी आतूर असतील.

चहलवर मोठी जबाबदारी

आरसीबीमध्ये गोलंदाजीसाठी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) नेहमीप्रमाणे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल. सोमवारी मिळालेल्या विजयात हा लेग स्पिनर महत्त्वाचा ठरला. पण, आरसीबीला  ख्रिस मॉरिसची कमतरता नक्की भासेल, स्नायूंवर ताण आल्यामुळे तो खेळू शकणार नाही. लिलावात मॉरिसला 10 कोटीमध्ये विकत घेण्यात आलं होतं (Kings XI Punjab VS Royal Challengers Bangalore).

उमेशच्या जागी सिराजला संधी?

पेसर उमेश यादव या यंदाच्या आयपीएलमध्ये रन देणारा गोलंदाज ठरत आहे. त्याचा खेळ पाहून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. टीम इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीला मधल्या फळीत कसं बसवेल ते पाहावं लागेल. जोस फिलिपला ओपनिंग फलंदाज म्हणून निवडण्यात आलं आहे, त्यामुळे अली हा प्लेईंग-XI मध्ये फक्त डेल स्टेनच्या जागी येऊ शकतो.

गेलचं पुनरागमन होण्याची शक्यता

किंग्ज इलेव्हन पंजाबचा मयांक अग्रवाल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राहुल, ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांच्याकडूनही चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. तर ‘बिग हिटर’ ख्रिस गेलचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

गोलंदाजीवर विशेष लक्ष

गोलंदाजीसाठी ऑलराऊंडर जिमी नीशामलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. पंजाबकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने त्याची जागा मिळवली आहे. तरुण खेळाडू रवी बिश्नोईनेही दिल्लीविरोधातील सामन्यात चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे.

संभाव्य संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : आरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डि विलियर्स, जोश फिलीप (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन आणि मोहम्मद सिराज

किंग्ज इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयांक अग्रवाल, करुण नायर, निकोलस पूरन/ख्रिस गेल, सरफराज खान, ग्लेन मॅक्सवेल, कृष्णप्पा गौतम, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, रवि बिश्नोई आणि मोहम्मद शमी

Kings XI Punjab VS Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या :

KKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

गौतम गंभीरकडून संजू सॅमसनचं कौतुक, चाहते म्हणाले, रिषभचं करिअर संकटात

IPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.