AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध पदार्पण अन् वैभवची भावूक प्रतिक्रिया; जे म्हणाला ते वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान; पोस्ट व्हायरल

भारत इंग्लंड यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडने पराभत केले. कालच्या सामन्यात अखेर वैभव सूर्यवंशीला डेब्यू मिळालाच. आता या पदार्पणाच्या सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट केली ज्याची चर्चा रंगली आहे.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध पदार्पण अन् वैभवची भावूक प्रतिक्रिया; जे म्हणाला ते वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान; पोस्ट व्हायरल
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 05, 2026 | 10:23 AM
Share

जागतिक क्रिकेटमध्ये ज्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो खेळाडू म्हणजे 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वैभवला संधी मिळाली नाही, तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर, 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला अखेर संधी मिळाली आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पदार्पणाच्या सामन्यात वैभवला केवळ 14 धावा करता आल्या असल्या तरी, त्याने निश्चितच छाप पाडली. सामन्यानंतर, वैभवने आंतरराष्ट्रय पदार्पणावर एक विधान केले.

वैभव सूर्यवंशीने आपल्या पहिल्याच सामन्यात दोन प्रभावी षटकारांसह 14 धावा करत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सामन्यानंतर, वैभवने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली पदार्पणाची कॅप हातात धरलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, “आपण सर्वांनी मिळून पाहिलेले स्वप्न मी जगत आहे. या कठीण काळात मला पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचे आभार. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.” वैभवने स्टोरीही टाकली आणि लिहिले की,  मला आलेल्या सर्व मॅसेजबद्दल मी आभारी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या हितचिंतकांचे आणि वरिष्ठांचे मी आभार मानू इच्छितो. मला माझ्या देशासाठी खेळायला मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो आणि मी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांचे आभार.”

आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभव सूर्यवंशी केवळ 14 धावाच करू शकला, पण त्याच्या दोन षटकारांपैकी एक षटकार त्याने जोफ्रा आर्चरविरुद्ध मारला. मात्र, एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभव विल जॅक्सने यष्टीचीत केला. आता, इंग्लंडविरुद्ध 7 जुलै रोजी नॉटिंगहॅम मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सर्वांचे लक्ष प्रामुख्याने वैभव सूर्यवंशीवर असेल, ज्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार