Virat Kohli : विजय हजारे ट्रॉफी मधील विराट कोहलीच्या मॅचबद्दल मोठा निर्णय, क्रिकेटप्रेमींना धक्का..

Virat Kohli, Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमधील विराट कोहलीच्या मॅच बद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आधी या स्पर्धेतील सामने बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होते, मात्र आता..

Virat Kohli : विजय हजारे ट्रॉफी मधील विराट कोहलीच्या मॅचबद्दल मोठा निर्णय, क्रिकेटप्रेमींना धक्का..
विराट कोहलीच्या मॅचबद्दल मोठी अपडेट
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 8:43 AM

Vijay Hazare Trophy 2025 : विजय हजारे ट्रॉफीला (Vijay Hazare Trophy) आजपासून सुरूवात होत असून रोहित शर्मा (Rohit Sharma) , तसेच विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक खेळाडू या स्पर्धेत सामने खेळणार असल्याने क्रिकेट प्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे. मात्र विराट कोहलीच्या मॅचबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. विजय हजारे ट्रॉफीतील केवळ विराट कोहलीचेच नाही तर बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणारे सर्व सामने आता हलवण्यात आले आहेत. या सर्व मॅचेस आता बंळुरूमधील BCCIच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील. कर्नाटक सरकारच्या निर्देशांनुसार सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये, विराट कोहली आणि त्याची टीम दिल्ली यांना आजा, अर्थात 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

विराटच्या मॅचचा व्हेन्यू चेंज

विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली जो सामना खेळेल तो आणि इतर सर्व सामन्यांच्या ठिकाणात बदल झाल्याची माहिती केएससीए (KSCA) म्हणजेच कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी क्रिकबझला दिली. चिन्नास्वामी येथे होणारे विजय हजारे यांचे सर्व सामने सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील असं KSCA च्या क्रिकबझला अधिकाऱ्यांनी सांगितलं. कर्नाटक सरकारच्या गृहमंत्रालयाने मंगळवारी सकाळी केएससीएला स्थळ बदलण्याची माहिती दिली, त्यानंतर केवळ हाच सामना नव्हे तर दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील सामन्यापूर्वीचे प्रशिक्षण सत्र देखील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे हलवण्यात आले.

रिकाम्या स्टेडियममध्ये होणार मॅचेस

पण बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये या मॅचेस हलवल्यानंतर प्रेक्षकांना ते सामने पाहण्याची परवानगी मिळेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, त्याबाबतची परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. हे सामने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जातील असे म्हटले जात आहे.  या संदर्भात कर्नाटक सरकारकडून आधीच मिळालेल्या सूचनांचे केएससीए पालन करणार आहे.

15 वर्षांनी विराट खेळणार विजय हजारे स्पर्धेतील मॅच

विराट कोहलीच्या सहभागामुळे दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी सामना खास बनला आहे. दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत विराटचे पुनरागमन होणार आहे. 2010-2011 साली विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मॅच खेळली होती.