AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Shankar : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडलेला विजय शंकर विश्वचषकातूनही बाहेर

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू विजय शंकर विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

Vijay Shankar : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडलेला विजय शंकर विश्वचषकातूनही बाहेर
| Updated on: Jul 01, 2019 | 2:40 PM
Share

लंडन : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू विजय शंकर विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळली आहे.  विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो विश्वचषक स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. त्याच्याऐवजी विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. आता त्यालाच दुखापत झाल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी विजय शंकर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. याचवेळी गोलंदाज जसप्रीत बुमराचा यॉर्कर त्याच्या पायावर लागला. यानंतर विजय शंकरला प्रचंड वेदना झाल्या आणि तो माघारी परतला होता. तरीही तो अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळला. मात्र तो चमकदार कामगिरी करु न शकल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्याऐवजी ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं.

दरम्यान, कर्नाटकचा मयांक अग्रवाल इंग्लंडला रवाना होण्याच्या तयारीत आहे. मयांक अग्रवालने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. तो अद्याप भारताकडून वन डे सामन्यात खेळला नाही.

कोण आहे मयांक अग्रवाल? 

मयांक अग्रवालने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळताना पाहून वयाच्या 10 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

कर्नाटकचा सलामीवीर म्हणून त्याची क्रिकेट कारकीर्द बहरली.

देशातंर्गत क्रिकेटमध्ये 2017-18 मध्ये मयांकने 2 हजार 253 धावा केल्या.

एका वर्षात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.

2010 मध्ये तो आयसीसीच्या अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात खेळला.

भारतीय टीममध्ये संधी मिळण्यासाठी त्याला अनेक वर्ष वाट बघायला लागली.

डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली.

मयांकनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचे रेकॉर्डही मोडले आहेत.

टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा मयांक अग्रवालचा आदर्श आहे.

27 वर्षांच्या मयांक अग्रवालनं 46 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 49.98 च्या सरासरीनं 3,599 रन केले आहेत. यामध्ये 8 शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

मयांक अग्रवालने नाबाद 304 नाबाद धावा ठोकण्याचा पराक्रम केला आहे.

भारताचे पुढील सामने

  • भारत वि. बांगलादेश, 02 जुलै
  • भारत वि. श्रीलंका, 06 जुलै

संबंधित बातम्या 

धवन बाहेर, भुवीला दुखापत, आता विजय शंकरनेही चिंता वाढवली 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.