दमदार विजयानंतर विराट ऑस्ट्रेलियन ओपनच्या मैदानात, अनुष्काही सोबत

मुंबई : भारतीय संघाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेमध्ये 2-1 ने पराभव करत, मालिकेवरही विजय मिळवला. दोन महिने सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शानदार असा शेवट केल्यानंतर, कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत टेनिस ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन पाहायला गेला होता. ही टुर्नामेंट मेलबर्नमध्ये सुरु आहे. येथे या दोघांनी प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररची भेटही घेतली. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उन्हाचं …

दमदार विजयानंतर विराट ऑस्ट्रेलियन ओपनच्या मैदानात, अनुष्काही सोबत

मुंबई : भारतीय संघाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेमध्ये 2-1 ने पराभव करत, मालिकेवरही विजय मिळवला. दोन महिने सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शानदार असा शेवट केल्यानंतर, कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत टेनिस ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन पाहायला गेला होता. ही टुर्नामेंट मेलबर्नमध्ये सुरु आहे. येथे या दोघांनी प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररची भेटही घेतली.

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उन्हाचं वातावरण आहे. क्रिकेटचे सामने संपल्यानंतर विराटने पत्नीसोबत ऑस्ट्रेलियाची सफर केली. यादरम्यान त्याने रॉजर फेडररचीही भेट घेतली. ऑस्ट्रेलियन ओपनचा सामना पाहण्यासोबतच विराट-अनुष्काने फेडररसोबत फोटो सेशनही केले.


दुसरीकडे, अनुष्काने विराटसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, सनी डे विद ब्यूटीफुल सनी बॉय.


तसेच, ही टुर्नामेंट पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्रीही उपस्थित होते. त्यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की, झिरो प्रेशरमध्ये टेनिस सामना पाहणे उत्तम असते.


क्रिकेटर आणि टेनिस यांचं नातं याआधीही दिसलं आहे. पूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही विम्बल्डन पाहण्यासाठी जात असे. सचिन आणि रॉजर तर दोघे चांगले मित्रही आहेत. आता या यादीत विराटचाही समावेश झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *