विराट कोहलीला आवडतो हा महागडा तांदूळ; 550 रुपये किलो किंमत, काय आहे या तांदळाची खासियत?
विराट कोहली त्याच्या डाएटबाबत खूप काटेकोर आहे. तो त्याच्या खाण्या-पिण्याच्याबाबत अनेक गोष्टी पाळतो. विराटच्या डाएटमध्ये एक खास प्रकारचा भात नेहमी असतो. विराट ज्या तांदळाचा भात खातो त्याची किंमत जवळपास 550 रुपये किलो आहे. अशी काय खासियत आहे या तांदळामध्ये.

असं नेहमी म्हटलं जातं की आपल्या आहाराचा परिणाम आपल्या त्वचेवर, आरोग्यावर आणि केसांवरही दिसून येतो. त्यामुळे सेलिब्रिटी असोत किंवा खेळाडू असोत. ते नेहमीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, व्यायामापासून ते डाएटपर्यंत सगळं नीट प्लान करतात. त्यात भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीचं नाव नक्कीच पुढे येतं. त्याने त्याच्या डाएटबाबत अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. एक खेळाडू असल्याने, विराटला त्याच्या आहारात प्रथिनांपासून ते फॅटपर्यंतच्या सर्व गोष्टींच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्यावे लागतं.
विराटच्या जेवणात खास तांदळाचा भात का खातो?
विराटच्या जेवणात त्याच्या डाएटचा विचार करून एक खास प्रकारचा भात खातो जो ग्लूटेन-मुक्त असतो. तसेच कमी कार्ब आणि कमी चरबीयुक्त असतो. हा खास तांदूळ सुरत शहरातून येतो. या तांदळाला फोर्टिफाइड तांदूळ असं म्हणतात. जो भारताच्या अन्न युनिट फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) द्वारे देखील प्रमोट केला जातो. या तांदळात काय खास आहे आणि ते कोणासाठी फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.
विराट फोर्टिफाइड भातच का खातो?
तांदूळ, गहू, दूध आणि इतर धान्यांचे फोर्टिफाइड प्रकार अधिक पौष्टिक असतात. फोर्टिफाइड तांदळातील पोषक घटक आणि ऊर्जा वाढवणारे घटक असतात. म्हणून, जेव्हा तुम्ही त्यांचे सेवन करता तेव्हा ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदे देतात. एफएसएसएआयच्या मते, फोर्टिफिकेशन प्रक्रियेमुळे गहू आणि तांदूळ यांसारख्या दैनंदिन अन्नात वापरल्या जाणाऱ्या धान्यांची तसेच तेल आणि दूध यांसारख्या गोष्टींची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामुळे अन्नातील आयोडीन, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि झिंक यासारख्या घटकांचे प्रमाण वाढते.
View this post on Instagram
या तांदळीची खासियत आणि किंमत
विराट कोहलीला राजमा चावल आणि छोले भटुरे यांसारखे भारतीय पदार्थ खाणे खूप आवडतात. पण, सामान्य भाताऐवजी, विराट कोहली फोर्टिफाइड भात खातो. अधिक पौष्टिक असण्यासोबतच, हा भात पचायला सोपा आणि अधिक आरोग्यदायी देखील असतो. विराट कोहली खात असलेल्या या भाताची म्हणजे तांदळाची किंमत तब्बल 550 रुपये किलो आहे. विराट कोहली त्याच्या डाएटबाबत खूप काटेकोर आहे. विराट कोहली मांस आणि मासे खात नाही, तो अशा प्रकारचा आहार घेऊन तंदुरुस्त राहतो.
फोर्टिफायड पदार्थ खाण्याचे फायदे
* फोर्टिफाइड अन्न खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला डोस मिळू शकतो * महिलांसाठी फोर्टिफाइड अन्न खूप फायदेशीर ठरू शकते कारण त्यात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि लोह सारखे घटक असतात * अॅनिमियाच्या रुग्णांसाठीही फोर्टिफायड पदार्थांचे सेवन फायदेशीर असते. कारण, या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचे काम करते. * पौष्टिकतेच्या कमतरतेची समस्या टाळण्यासाठी, तुम्ही फोर्टिफाइड तृणधान्ये खाऊ शकता. * शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, फोर्टिफाइड पदार्थांचे सेवन करू शकता. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. * वजन कमी करण्यासाठी फोर्टिफाइड तृणधान्ये देखील खूप फायदेशीर असतात. हे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चयापचय वाढतो आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
