Video : विराट कोहली बांगलादेश मालिकेच्या तयारीत गुंतला, जीममध्ये गाळला घाम , व्हिडिओ व्हायरल

न्यूझिलंड दौऱ्यावर युवा खेळाडूंची टीम पाठवण्यात आली आहे.

Video : विराट कोहली बांगलादेश मालिकेच्या तयारीत गुंतला, जीममध्ये गाळला घाम , व्हिडिओ व्हायरल
virat kohli
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 24, 2022 | 3:11 PM

मुंबई : टीम इंडियाचा (IND) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगला चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्याच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळे तो कायम चर्चेत असतो. दोन दिवसापुर्वी कलरफुल टी-शर्ट घातल्यामुळे त्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर चाहत्यांनी कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले. पुढच्या महिन्यात झिम्बाब्वे दौरा होणार आहे.

झिम्बाब्वे दौऱ्या आगोदर विराट कोहली मैदानात आणि जीममध्ये अधिक मेहनत घेत आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये विराट कोहली जीममध्ये घाम गाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत सुद्धा चांगली कामगिरी केली. टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहली निराश चेहऱ्याने पॅव्हेलियनकडे परतला. गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. न्यूझिलंड दौऱ्यावर युवा खेळाडूंची टीम पाठवण्यात आली आहे. न्यूझिलंडचा दौरा संपल्यानंतर पुढच्या महिन्यात झिम्बाब्वे दौरा होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत.

एकदिवसीय टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

टीम इंडिया कसोटी संघ: रोहित शर्मा (क), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.