Virat Kohli : ना पत्नी अनुष्का, ना लेक वामिका… विराट कोहली कोणाला डेडिकेट करतो प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड ?

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीने 91 चेंडूत 93 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा विराटचा 91 वा POTM पुरस्कार होता.

Virat Kohli : ना पत्नी अनुष्का, ना लेक वामिका... विराट कोहली कोणाला डेडिकेट करतो प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड ?
विराट कोहली
| Updated on: Jan 12, 2026 | 10:09 AM

India vs New Zealand : बडोद्यामध्ये काल न्युझीलंडविरुद्धच्या वनडे मॅचमध्ये भारताने विजय मिळवला. न्युझीलंडला 4 विकेट्सनी हरवून भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. विराट कोहली याच्या शानदार खेळीमुळे भारताला हा विजय मिळाला. या सामन्यात विराटचं (Virat Kohli) शतक थोडक्यात हुकलं, तो 93 धावांवर बाद झाला. न्युझीलंडच्या 301 धावांचा पाठलाग करताना विराटने 91 चेंडूत 93 धावा केल्या, त्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा त्याच्या वनडे करिअरमधील 45वा आणि इंटरनॅशनल करिअरमधील 71 वा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे. मात्र एवढे सगळे पुरस्कार मिळाल्यानंतर आता याबद्दल एक विशेष माहिती समोर आली आहे. या सगळ्या पुरस्कारांचं विराट काय करतो, ते तो कोणाला देतो ? याबद्दल खुद्द विराटनेच माहिती दिली आहे.

कोणाला पुरस्कार देतो विराट ?

याबद्दल विराटला पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. प्रेझेंटर हर्षा भोगले यांनी विराटला एक सवाल विचारला की, 45 प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड तर खूप होतात ना. ते ठेवण्यालाठी तुला एका वेगळ्या खोलीची गरज पडत असेल ना ?

त्यावर विराटने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. हे पुरस्कार तो त्याची पत्नी अनुष्का किंवा मुलं वामिका- अकायला देत नाही तर जिंकलेल्या सर्व ट्रॉफी, पुरस्कार तो त्याच्या आईला पाठवतो. खुद्द विराटनेचा याचा खुलासा केला. तो म्हणाला सगळे पुरस्कार गुडगावला आईला पाठवतो. आला हे अवॉर्ड देण्यामागचं खास कारणही त्याने सांगितलं. तो म्हणाला की, आईला त्याने जिंकलेल्या ट्रॉफी जपून ठेवायला आवडतात. त्यामुळे तिला अभिमान वाटतो असं खास उत्तर त्याने दिलं.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त POTM पुरस्कार कोणाकडे ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द मॅच अर्थात POTM जिंकण्यात कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पेक्षा जास्त POTM पुरस्कार हे फक्त सचिन तेंडुलकरने जिंकले आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 76 POTM जिंकलेत, तर विराटला 71 वेळा हे अवॉर्ड मिळाले आहेत. त्यातले 45 तर वनडे मधलेच आहेत.याचा अर्थ विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम लवकरच करू शकेल. त्याच्या आणि सचिन तेंडुलकरला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये आता अवघ्या 5 ऑवॉर्डचं अंतर आहे.