Virat Kohli : ‘विराट’ कामगिरी ! सचिन, धोनीला पिछाडीवर टाकून कोहलीची घोडदौड सुरूच
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने खेळात नवनवे विक्रम रचले आहेत. आता त्याने आणखी एक विक्रम रचत क्रिकेटचा देव सचिन तेडुलकर आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा एम.एस.धोनी यालाही पिछाडीवर टाकले आहे.

Virat Kohli Brand Valuation : टेस्ट क्रिकेट आणि टी-20 फॉरमॅटमधून विराच कोहलीने निवृत्त घेतली असली तर वन-डेमध्ये तो अद्यापही खेळत आहे. बऱ्याच काळात त्याची बॅटची कामगिरी दिसली नसून त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत . मात्र असं असलं तरीही दिग्गज फलंदाज असलेल्या कोहलीचीही कमाई काही कमी झालेली नाही. कमाईच्या बाबतीत तो यादीत आघाडीवर आहे. एवढंच नव्हे तर त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकले आहे. या यादीत तेंडुलकर पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहलीने दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, टी-20मधूनहीतो बाहेर पडला. त्यामुळे विराट आता फक्त एकदिवसीय सामने खेळेल. तरीही, तो जाहिरात जगात प्रमुख आहे.
विराट कोहली सर्वात आघाडीवर
द क्रॉल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन 2024 च्या अहवालांनुसार, माजी भारतीय कर्णधार विराट कोहली त्याच्या सोशल मीडिया एंगेजमेंटमुळे 231.1 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 2048 कोटी रुपये) च्या ब्रँड व्हॅल्यूसह सर्वात मौल्यवान भारतीय सेलिब्रिटी म्हणून यादीत अव्वल स्थानावर आहे. या अहवालात टॉप-25 सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींची यादी देण्यात आली आहे.
तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा दुसऱ्या स्थानावर असून त्याची ब्रँड व्हॅल्यू 170.7 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1512 कोटी रुपये) आहे. मात्र, यावेळी त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये घट झाली आहे. या यादीत बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 21 टक्क्यांनी वाढली असून ती 145.7 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1291 कोटी) झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चौथ्या स्थानावर आहे, ती 116.4 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1031 कोटी रुपये) च्या मूल्यांकनासह सर्वात मौल्यवान महिला सेलिब्रिटी बनली आहे.
सचिनचीही वाढली ब्रँड व्हॅल्यू
या वर्षी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यूही वाढली आहे. 2023 मध्ये तो यादीत आठव्या क्रमांकावर होता, पण यावेळी तो पहिल्या पाचमध्ये आला आहे. त्याचे ब्रँड व्हॅल्यूएशन 112.1 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 994 कोटी रुपये) आहे. या यादीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही टॉप-10 मध्ये समावेश आहे.
सोशल मीडियावरही विराटची चलती
द क्रॉलचे मॅनेजिंग डायरेक्टर उमाकांत पाणिग्रही म्हणाले की, विराट कोहली हा केवळ एक दिग्गज नाही तर एक हुशार व्यावसायिक देखील आहे. यामुळे तो एक शक्तिशाली ब्रँड बनला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कोहलीचे सोशल मीडियावर अंदाजे 387 दशलक्ष चाहते आहेत. पाणिग्रही यांनी सांगितले की, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये कोहलीच्या जाहिरातींच्या शुल्कात फारशी वाढ झाली नाही. कोहलीचे जाहिरात शुल्क अंदाजे 10-11 कोटीआहे. तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सोशल मीडिया चाहता वर्ग देखील 5 टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी नमूद केलं.
