‘या’ब्रँडचा शूज आहे विराट कोहलीचा फेव्हरेट; किंमतीचा आकडा हजारोंच्या घरात
विराट कोहली हे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू तसेच तो एक सुपरस्टार आहे. त्यामुळे तो काय वापरतो,काय खातो, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण विराट कोणत्या ब्रँडचे शूज वापरतो याबद्दल नक्कीच त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. विराट कोहलीचा हा शूज ब्रँड आहे प्रचंड फेव्हरेट. त्या शूजची किंमत ऐकून धक्का बसेल.

बॉलिवूड सेलिब्रिटी असो किंवा एखादा स्पोर्टपर्सन, ते कोणत्या ब्रॅंडचे कपडे वापरतात, कोणते शूज वापरतात, त्यांचं डाएट काय असतं , तसेच अभिनेत्रींबद्दल म्हणायचं तर ती कोणत्या ब्रॅंडचे कपडे घालते, कोणते बॅग वापरते अशा अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना नक्कीच आकर्षण असतं. त्यात अनेक बॉलिवूड कलाकार तसेच स्पोर्टपर्सन हे बऱ्याच गोष्टींचे ब्रँड ॲम्बेसेडरही असतात.
विराट कोहलीला फिटनेस, स्टाईलला सर्वजण फॉलो करतात
त्याचप्रमाणे अनेकांना आकर्षण असतं ते भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल. विराट कोहली हा लोकप्रिय क्रिकेटर असण्यासोबतच तो एक सुपरस्टार आहे. त्यामुळे तो काय वापरतो,काय खातो, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तसेच विराट कोहलीच्या फिटनेस, स्टाईल स्टेटमेंट फॅन्स सर्वजण फॉलो करतात.
View this post on Instagram
विराट कोणत्या ब्रँडचे शूज वापरतो?
विशेष करून त्याच्या शूज बद्दल. विराट कोणत्या ब्रँडचे शूज वापरतो हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. चला तर मग जाणून घेऊयात विराट कोहली कोणत्या ब्रँडचे शूज वापरतो आणि त्याची किंमत काय आहे ते.
विराट कोहली वापरतो ‘या’ ब्रँडचे शूज
विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम, श्रीमंत आणि लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे साहजिकच, तो वापरत असलेल्या वस्तू उच्च दर्जाच्या आणि महागड्याच असणार. पण विराटचा आवडीचा ब्रँड हा ‘पुमा’ आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा तो‘पुमा’ब्रँडचे शूज घालून खेळताना दिसतो. ‘पुमा’ही एक जागतिक स्तरावरची स्पोर्ट्सवेअर कंपनी आहे. तसेच विराट कोहली ‘पुमा’ ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. पण तरीही त्याचा आवडीचा ब्रँड हा पुमाच असल्याचं त्याने सांगितलं होतं.
शूजची किंमत जाणून आश्चर्य वाटेल
डीएससी (DSC) या भारतीय स्पोर्ट्स कंपनीच्या माहितीनुसार, विराट कोहली वापरत असलेल्या ‘पुमा’शूजची किंमत साधारणपणे 20 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
खेळाडू स्पाइक असलेले बूट का घालतात?
तसेही क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू मोठे स्पाइक असलेले बूट घालतात. ज्यामुळे त्यांना मैदानात पळणे सोपे होते. त्या शूजमुळे खेळाडूंना पळताना चांगली ग्रीप मिळते. जवळपास आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारे प्रत्येक खेळाडू असेच बूट वापरताना पाहायला मिळतात.
