AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: विराट कोहलीची बटलरला ठसन, शाब्दिक चकमक उडाली; व्हिडिओत आँखो देखा हाल कैद!

टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम टी-20मध्ये इंग्लंडवर मात केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने ही सीरिज 3-2ने जिंकलीही आहे. (Watch: Virat Kohli And Jos Buttler Fight On The Field After The Latter’s Dismissal)

VIDEO: विराट कोहलीची बटलरला ठसन, शाब्दिक चकमक उडाली; व्हिडिओत आँखो देखा हाल कैद!
Virat Kohli And Jos Buttler
| Updated on: Mar 21, 2021 | 9:37 AM
Share

अहमदाबाद: टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम टी-20मध्ये इंग्लंडवर मात केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने ही सीरिज 3-2ने जिंकलीही आहे. या पाचव्या टी-20च्या विजयाचा शिल्पकार भुवनेश्वर कुमार ठरला. तर कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामन्यात भारताने आधी फलंदाजी घेत इंग्लंडसमोर 225 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडची टीम अवघ्या 188 धावात ढेपाळली. असं असलं तरी विराट कोहली आणि जोस बटलर यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळेही हा सामना बराच गाजला. (Watch: Virat Kohli And Jos Buttler Fight On The Field After The Latter’s Dismissal)

क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंमध्ये होणारे वाद आणि झगडे हे तसे नवीन नाहीत. परंतु, विराट कोहली आणि बटलर दरम्यान काल झालेला झगडा हा तसा मोठाच होता. दोघांमध्येही उघडपणे शाब्दिक चकमक उडाली होती. एवढेच नव्हे तर या दोघांनी एकमेकांना ठसन देत एकमेकांकडे कूचही केली. त्यामुळे या दोघांमध्ये किती टोकाचं वाजलं असेल याचा अंदाज येतो.

13व्या षटकावेळी तणातणी

इंग्लंडचा डाव सुरू असताना 13 व्या षटकावेळी हा वाद झाला. 225 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसरा धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला बाद केलं. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 130 होती. बाद झाल्यानंतर बटलर परत जात होता, तेव्हा त्याने विराटकडे पाहून काही तरी कमेंट केली. बस्स झालं. बटलरच्या या कमेंटवर विराटचा पारा चढला. त्यामुळे विराट तावातावाने बटलरच्या दिशेने जायला निघाला. डोकं गरम झालेल्या विराटनेही मग त्याच्यावर लाखोली वाहण्यास सुरुवात केली. त्यामुळे बटलरही भडकला आणि दोघेही एकमेकांच्या दिशेने यायला लागले.

ठसन कॅमेऱ्यात कैद

विराट आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून इंग्लंडच्या बटलरने डगआऊटकडे जाणं थांबवलं. त्याऐवजी तो मैदानाच्या दिशेने येऊ लागला. त्यावेळी बटलर आणि विराट दोघेही एकमेकांना पाहून काहीतरी बडबडत होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, हे दोघे कोणत्या कारणामुळे एकमेकांवर आगपाखड करत होते आणि काय बोलत होते हे कळू शकले नाही.

बटलरची अर्धशतकी खेळी

225 धावांचा पाठलाग करताना बटलरने चांगली सुरुवात केली. त्याने 34 चेंडूत दमदार 52 धावा ठोकल्या. त्यात दोन चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 152.94 इतका होता.

सुरुवात चांगली, पण…

जोस बटलरने इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. परंतु इंग्लंडच्या मीडल ऑर्डरला आणि तळाच्या फलंदाजांना हा टेम्पो राखता आला नाही. त्यामुळे इंग्लंडला हाताशी येणारा सामना गमवावा लागला. इंग्लंडकडून बटलरशिवाय डेव्हिड मलानने अर्धशतक ठोकलं. मलानने 68 धावा केल्या. (Watch: Virat Kohli And Jos Buttler Fight On The Field After The Latter’s Dismissal)

संबंधित बातम्या:

India vs England Odi Series 2021 | इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला संधी

India vs England T20 Series 2021 | टीम इंडियाचा सलग सहावा टी 20 मालिका विजय

Virat Kohli | कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक

(Watch: Virat Kohli And Jos Buttler Fight On The Field After The Latter’s Dismissal)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.