वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची निवृत्तीची घोषणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई: वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) एकदिवसीय अर्थात वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर (Cricket World Cup) ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.  क्रिकेट वेस्ट इंडिजने (windies cricket) ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. वन डे विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात वन […]

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची निवृत्तीची घोषणा
Follow us on

मुंबई: वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) एकदिवसीय अर्थात वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर (Cricket World Cup) ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.  क्रिकेट वेस्ट इंडिजने (windies cricket) ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. वन डे विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात वन डे मालिका होणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वीच गेलने आधीच आपण विश्वचषकानंतर निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

ख्रिस गेलचं बऱ्याच दिवसांनी वेस्ट इंडिजच्या वन डे संघात पुनरागमन झालं आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ख्रिस गेलची निवड करण्यात आली आहे. मात्र आता त्यांनतर गेलने निवृत्ती जाहीर केली.

ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक शतकं ठोकणारा खेळाडू आहे. ब्रायन लारानंतर वन डेमध्ये त्याच्या सर्वाधिक धावा आहेत.

ख्रिस गेलने 1999 मध्ये भारताविरुद्ध वन डेमध्ये पदार्पण केलं होतं. गेलने आतापर्यंत 284 वन डे सामन्यात 9727 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 23 शतकं आणि 49 अर्धशतकं ठोकली आहेत. ब्रायन लाराच्या नावे वन डेमध्ये 10,405 धावांची नोंद आहे.

तर गेलने 103 कसोटी सामन्यात 7214 धावा केल्या आहेत. शिवाय 56 टी 20 सामन्यात 1607 धावा ठोकल्या.

39 वर्षीय ख्रिस गेलने 2015 मधीव वन डे विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध तुफानी खेळी केली होती. गेलने त्या सामन्यात तब्बल 215 धावा ठोकल्या होत्या.

गेलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत आणि बांग्लादेश दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. गेल्या वर्षी 7 जुलैला गेलने शेवटचा वन डे सामना खेळला होता.

ख्रिस गेलची कारकीर्द

284 वन डे सामने – 9727 धावा – 23 शतकं, 49 अर्थशतकं, 165 विकेट्स

103 कसोटी सामने – 7214 धावा – 15 शतकं, 37 अर्थशतकं, 73 विकेट्स

56 टी 20 सामने – 1607 धावा, 2 शतकं, 13 अर्धशतकं, 17 विकेट्स