
SuryaKumar Yadav On Gautam Gambhir : टी20 वर्ल्ड कप 2026 ला आता फक्त एक दिवस उरलाय. उद्या 7 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपची सुरुवात होईल. भारत आपलं विजेतेपद राखण्यासाठी पुन्हा मैदानात उतरेल. डिफेंडिंग चॅम्पियन टीम इंडिया उद्याच आपला पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळणार आहे. संयुक्त राज्य अमेरिका USA विरुद्ध मॅच आहे. संध्याकाळी 7 वाजता ही मॅच सुरु होईल. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्या जोडीचा पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाचं टी 20 मध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन राहिलं आहे. टीम सातत्याने या प्रकारात चांगली कामगिरी करतेय. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रेसिंग रुममधील वातावरण खूप चांगलं आहे. टुर्नामेंट आधी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत टीमची तयारी आणि गंभीरच्या कोचिंगवर मोकळेपणाने बोलला.
गौतम गंभीर यांचं मैदानावरील वर्तन पाहिल्यानंतर ते खूप कठोर वाटतात. त्यांचा धाक वाटतो. पण प्रत्यक्षात तसं नाहीय. गौतम गंभीर आल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जे वातावरण असतं, त्यावर सूर्यकुमार यादव मोकळेपणाने बोलला. “गौतम गंभीर आल्यानंतर टीममध्ये मोठा बदल झाला आहे. ड्रेसिंग रुममधील वातावरण हलकं-फुलकं असतं. व्यक्तीगत परफॉर्मन्सपेक्षा आता टीमच्या गरजा काय आहेत, त्यावर लक्ष दिलं जातं. त्याने इशान किशनच उदहारण दिलं. एक सामन्यात इशान किशन 90 च्या पुढे खेळत होता. पण त्याने कुठलाही विचार न करता सिक्स मारुन शतक पूर्ण केलं. कारण टीमला त्यावेळी वेगवान धावगतीची गरज होती. मैदानावरील दोन फलंदाजांना आपली शैली आणि स्थितीनुसार खेळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे” असं सूर्याने सांगितलं.
गंभीर कोच बनल्यानंतर टी 20 मध्ये 41 पैकी भारताने किती सामने जिंकलेत?
गौतम गंभीर 2024 सालच्या टी 20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचे हेड कोच बनले. तेव्हापासून टी 20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा दबदबा आहे. भारतीय टीमने या दरम्यान 41 टी 20 सामन्यात 33 विजय मिळवले आहेत. फक्त 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. म्हणजे भारताने 85 टक्के सामने जिंकलेत. अन्य टीम्सच्या तुलनेत विजयाची टक्केवारी खूप जास्त आहे. कुठलीही टीम 30 विजय मिळवू शकलेली नाही.
ग्रुप ए मध्ये भारतासोबत कुठल्या-कुठल्या टीम्स ?
गौतम गंभीरच्या कोचिंगखाली भारताने चॅम्पिन्स ट्रॉफी 2025 चा किताब जिंकला. आता भारताची नजर टी 20 वर्ल्ड कपवर आहे. या टुर्नामेंटध्ये भारतासोबत ग्रुप ए मध्ये यूएसए, नामीबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड या टीम आहेत. पहिली मॅच USA विरुद्ध असल्याने टीमला चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवाच्या नेतृत्वाखाली टीममध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचं चांगलं संतुलन आहे. ही जोडी मिळून भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनवेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.