
Smriti Mandhana Marriage : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होणार होतं… पण काही कारणांमुळे लग्न होऊ शकलं नाही… त्यानंतर स्मृती सोशल मीडियापासून दूर होती. लग्नाची चर्चा सुरु असताना स्मृती हिने 12 दिवसांनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला. त्यानंतर चाहत्यांनी देखील मोकळा श्वास घेतला… त्यानंतर स्मृतीने रविवारी एक पोस्ट लग्न रद्द झाल्याची घोषणा केली आहे.
लग्न रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर स्मृती मानधना हिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्मृती हिने वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी ताज्या केल्या… स्मृती म्हणाली, ‘फलंदाजी करताना जास्त विचार करण्याची गरज नव्हती कारण ती संघाच्या गरजेनुसार खेळत होती. पण, क्षेत्ररक्षण करताना मानधना देवाचे स्मरण करत होती.’
स्मृती म्हणाली, ‘क्षेत्ररक्षण करताना मी सर्व देवांना आठवत होता… 300 बॉल पूर्ण होईपर्यंत मी देवाला आठवत होती आणि विकेट मिळवा यासाठी प्रार्थना करत होती… ‘ सध्या स्मृती हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे..
पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे महिला क्रिकेट संघात आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं आणि त्यानंतर स्मृती हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठी घोषणा केली. पलाश मुच्छल याच्यासोबत असलेल्या नात्याला स्मृती हिने पती – पत्नीचं नाव देण्याचा विचार केला. खास अंदाजात स्मृती हिने साखरपुडा झाल्याची घोषणा केली. त्यानंतर ज्या मैदानावर स्मृती हिने वर्ल्ड कप जिंकला, त्याच ठिकाणी पलाश याने स्मृतीला लग्नाची मागणी घातली…
लग्नापूर्वीच्या विधी देखील मोठ्या थाटात साताऱ्यात पार पडल्या… पण लग्न झालं. त्यानंतर स्मृती आणि पलाश यांच्या खासगी आयुष्याच्या अनेक चर्चा रंगल्या… अखेर स्मृती हिने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न रद्द केल्याची घोषणा केली आहे. तर पलाशने त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर दणका देणार असल्याचा थेट इशारा दिला.