AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयने मनात नसतानाही गंभीरला बनवले कोच? व्हीव्हीएस लक्ष्मणचा धक्कादायक खुलासा

2023 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, टीम इंडियाला अंतिम सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे अब्जावधी भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले. या मोठ्या स्पर्धेसोबतच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. द्रविडचा कार्यकाळ नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला. यामागे गौतम गंभीर नव्हे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण होते.

बीसीसीआयने मनात नसतानाही गंभीरला बनवले कोच? व्हीव्हीएस लक्ष्मणचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Aug 10, 2026 | 11:16 AM
Share

2023 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, टीम इंडियाला अंतिम सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे अब्जावधी भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले. या मोठ्या स्पर्धेसोबतच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. द्रविडचा कार्यकाळ नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला. यामागे गौतम गंभीर नव्हे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण होते. लक्ष्मण यांनी आता एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे, की ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनणार हे जवळपास निश्चित होते, परंतु त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे ही जबाबदारी नाकारली.

राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, व्हीव्हीएस लक्ष्मण बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 2023 मध्ये जेव्हा द्रविडचा कार्यकाळ संपला, तेव्हा त्यांनी जय शाह यांच्याशी संवाद साधला होता. लक्ष्मणने आता एका मीडिया मुलाखतीत हे उघड केले आहे, तो म्हणाला, “मी 2023 मध्ये मुख्य प्रशिक्षक होणार होतो, पण वैयक्तिक कारणांमुळे मी ते पद नाकारले.” जय शाह आणि बीसीसीआयने माझ्या चिंता समजून घेतल्या आणि मला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. मी बोर्डाला वचन दिले होते की, जरी मी मुख्य प्रशिक्षक होत नसलो तरी, मी सेंटर ऑफ एक्सलन्सची भक्कमपणे स्थापना करेन.

माजी भारतीय कसोटी विशेषज्ञ फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने 2021 मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून, लक्ष्मण CoE चे प्रमुख आहेत आणि भारतीय क्रिकेटसाठी प्रतिभा घडवण्याचे काम करत आहेत. टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबाबत लक्ष्मणने हे स्पष्ट केले की, CoE केवळ खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी तयार करण्याचे कामही करते.

लक्ष्मणने 2023 मध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिल्यानंतर, द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाने 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आता 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सर्वात मोठी जबाबदारी गंभीरच्या खांद्यावर असेल.

Follow Us
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!