Womens Asia Cup Prize Money: आशिया कपची ट्रॉफी जिंकली पण टीम इंडियाला मिळणार नाही बक्षिस रक्कम, असं का?

IND w vs SL W: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप २०२६ चा फायनल सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आणि आशिया कपची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

| Updated on: Sep 14, 2026 | 12:36 AM
1 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप २०२६ मधीला फायनल सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. या सोबतच आशिया कपच्या ट्रॉफीवर भारतीय संघाने आपले नाव कोरले.

भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप २०२६ मधीला फायनल सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. या सोबतच आशिया कपच्या ट्रॉफीवर भारतीय संघाने आपले नाव कोरले.

2 / 5

भारतीय संघाने महिला आशिया कप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. भारताने आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या श्रीलंकेवर ७२ धावांनी मोठा विजय मिळवला

3 / 5

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या. श्रीलंकेची फलंदाजी यशस्वी ठरली नाही आणि त्यांचा संघ शेवटच्या षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला.

4 / 5

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने दमदार सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी १२.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी १२९ धावा जोडल्या. शफाली आणि मंधाना यांनी महिला टी२० आशिया कपच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही रचला.

5 / 5

भारतीय संघाने ट्रॉफी जरी जिंकली असली तरीही संघाला बक्षिस रक्कम मिळणार नाही, कारण बीसीसीआय आशिया कप विजयाची रक्कम घेत नाही. हा पैसा इतर क्रिकेट बोर्डाच्या प्रगतीसाठी देते

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us