टीम इंडियाची झाडाझडती, खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील मागवला!

सीओएच्या या निर्णयाने केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही आश्चर्यचकीत आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी के जैन यांनीच निवृत्त घ्यावा, असं निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणाले.

टीम इंडियाची झाडाझडती, खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील मागवला!

नवी दिल्ली : विश्वचषकातील पराभवानंतर टीम इंडियाची झाडाझडती सुरु झाली आहे. विजयानंतर कोट्यवधी रुपयांची बक्षीसं देणारी बीसीसीआय, पराभवानंतर हिशेब मागत आहे. BCCI चं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समिती (COA) ने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली आहे.

सीओएच्या या निर्णयाने केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही आश्चर्यचकीत आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी के जैन यांनीच निवृत्त घ्यावा, असं निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणाले.

बीसीसीआयने क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास आधी नकार दिला होता. मात्र नंतर काही अटींसह त्यांना परवानगी दिली होती. त्याचाच दाखला देत न्यायमूर्ती लोढांनी म्हणणं मांडलं.

“लोकपालांनी आता लोढा समितीच्या प्रस्तावित संविधानाविरुद्ध उचलल्या जाणारी पावलं रोखायला हवीत. प्रत्येकजण आपल्यापरीने लोढा समितीच्या शिफारसींचा अर्थ लावत आहे. आमच्या सूचना संविधानाच्या चौकटीत आहेत. जर त्याविरुद्ध पावलं उचलली जात असतील, तर लोकपालांनी हस्तक्षेप करायला हवा” असं न्यायमूर्ती लोढा म्हणाले.

कर्णधार, प्रशिक्षक तसंच खेळाडूंनी आपल्या पत्नी आणि प्रेयसींना परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणं हे हितसंबंधांची बाब आहे. मात्र बीसीसीआयसाठी आपण नवे असे नियम बनवले आहेत, असं लोढा म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *