नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की...जय!

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान लंडनचं ओव्हल मैदान भारतीय प्रेक्षकांनी निळंशार झालं होतं. खचाखच भरलेल्या मैदानातीलभगवा झेंडा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

Saffron flag in london, नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय!

CWC 2019 लंडन : सलामीवीर शिखर धवनची शतकी खेळी आणि गोलंदाजाच्या दमदार कामगिरीमुळे भारताने विश्वचषकातील दुसरा विजय मिळवला. लंडनच्या ओव्हल मैदानात काल (9 जून)  खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. धवनच्या 117, कर्णधार विराट कोहलीच्या 82 आणि रोहित शर्माच्या 57 धावांच्या जोरावर, भारताने कांगारुंसमोर 353 धावांचं तगडं आव्हान उभं केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन टीमचा पार धुव्वा उडाला. भारताने कांगारुंना 50 षटकात 316 धावांत गुंडाळलं.

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान लंडनचं ओव्हल मैदान भारतीय प्रेक्षकांनी निळंशार झालं होतं. जिकडे-तिकडे निळ्या जर्शीतील भारतीय प्रेक्षक दिसत होते. या प्रेक्षकांतील एक प्रेक्षक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता, ज्याच्या हातात छत्रपती शिवरायांचा भगवा होता. खचाखच भरलेल्या मैदानातील हा भगवा झेंडा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

हा पठ्ठ्या कोण याचा शोध टीव्ही 9 मराठीने घेतला. हातात भगवा घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा पठ्ठ्या म्हणजे पुण्याजवळच्या नारायणगावातील सागर कुलकर्णी.. सागर कुलकर्णी यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भगव्या झेंड्यासह हजेरी लावली.

“मी नारायणगावचा आहे. शिवरायांचा जन्म ज्या भूमीत झाला, त्या भूमीतील मी असल्याचं सौभाग्य मला लाभलं. त्यामुळेच वर्ल्डकपमध्ये शिवरायांचा झेंडा फडकवण्याचं मी ठरवलं. महाराजांचा झेंडा मी पूर्ण वर्ल्डकपमध्ये फडकवणार आहे. पुणेरी टोपी घालून महाराजांचा जयघोष करणार आहे”, असं सागर कुलकर्णी यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *