जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी! सोन्याने केली डिझाइन; किंमत ऐकून थक्क व्हाल
शनिवारी होणाऱ्या सामन्यात जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी परिधान करून एक संघ मैदानात उतरणार आहे. ही जर्सी खास पद्धतीने 18 कॅरेट सोन्याने डिझाइन करण्यात आली आहे.

वेस्टइंडीज चॅम्पियन्स संघ जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी परिधान करणार आहे. ही जर्सी वेस्टइंडीजच्या दिग्गज खेळाडूंनी ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड आणि ख्रिस गेल यांनी लॉन्च केली आहे. ही जर्सी 18 कॅरेट सोन्याने खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. वेस्टइंडीज चॅम्पियन्स संघ ही जर्सी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टूर्नामेंटमध्ये परिधान करून खेळताना दिसेल. या टूर्नामेंटला 18 जुलैपासून सुरुवात झाली असून, ही लीग 2 ऑगस्टपर्यंत खेळली जाईल.
वेस्टइंडीज चॅम्पियन्स संघ परिधान करणार जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी
ही जर्सी दुबईच्या लोरेंज ग्रुपने चॅनेल 2 ग्रुपच्या सहकार्याने तयार केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स टूर्नामेंटमध्ये वेस्टइंडीजचे दिग्गज खेळाडू ही जर्सी परिधान करताना दिसतील. ही जर्सी वेस्टइंडीजच्या दिग्गज खेळाडू सर क्लाइव्ह लॉयडपासून ते ख्रिस आणि आधुनिक दिग्गज खेळाडूंच्या सन्मानार्थ तयार करण्यात आली आहे. ही जर्सी विशेषतः वेस्टइंडीज संघासाठी 18 कॅरेट सोन्यामध्ये बनवण्यात आली आहे. ही जर्सी 30 ग्रॅम, 20 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या आवृत्तींमध्ये उपलब्ध आहे. अनेक अहवालांनुसार, या जर्सीची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
वाचा: जितका पापी माणूस, तितकाच तो…; दररोज पत्नीच्या पायापडतो हा अभिनेता, अजय देवगणने उडवली खिल्ली
Gayle, Pollard among West Indies Champions to don most expensive jersey in Cricket history made of 30gms of Gold. 🤯
– Dubai-based Lorenze made the Jersey in partnership with Channel2 Group. pic.twitter.com/8IOKfKeKpy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 18, 2025
वेस्टइंडीज चॅम्पियन्स शनिवारी खेळणार पहिला सामना
वेस्टइंडीज चॅम्पियन्स संघ वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स टूर्नामेंटच्या मोहिमेला शनिवारपासून सुरुवात करणार आहे. वेस्टइंडीज संघाचा सामना साउथ आफ्रिका चॅम्पियन्सशी होईल. वेस्टइंडीज संघाचं कर्णधारपद यावेळी ख्रिस गेल सांभाळणार आहे. या टूर्नामेंटमध्ये एकूण 6 संघ सहभागी होत आहेत, ज्यात इंडिया चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, पाकिस्तान चॅम्पियन्स आणि इंग्लंड चॅम्पियन्स यांचा समावेश आहे. या टूर्नामेंटमध्ये सुरेश रैना, युवराज सिंग, ब्रेट ली, ओएन मॉर्गन आणि एबी डिव्हिलियर्स यांसारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील.
वेस्टइंडीज चॅम्पियन्स संघ
ख्रिस गेल (कर्णधार), कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, शेल्डन कॉटरेल, शिवनारायण चंद्रपॉल, चॅडविक वाल्टन, शॅनन गॅब्रियल, ॲश्ले नर्स, फिडेल एडवर्ड्स, विल्यम पर्किन्स, सुलेमान बेन, डेव मोहम्मद, निकिता मिलर.
