Vaibhav Sooryavanshi: बॉलिंग अॅक्शन सेम टू सेम असली तरीही तू…वैभवच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट
Vaibhav Sooryavanshi Bowling Action: वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनची आता चर्चा रंगली आहे. युवराज सिंगशी वैभवच्या बॉलिंगची तुलना होत असल्याने त्यांनी आता थेट प्रतिक्रिया दिली आहे.

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, आता टी-२० नंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत आहे. सध्या तो दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळतो. तो संघाचा उपकर्णधारही आहे. पण इशान किशनला झालेल्या दुखापतीमुळे आता वैभवच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी पडली, वैभव ती जबाबदारी चोखपणे निभावतही आहे, वैभवने थेट अंपायरच्या निर्णयाला आव्हान करुन डीआरएस घेतला आणि यशस्वीही झाला. वैभवच्या फलंदाजीप्रमाणे आता त्याच्या गोलंदाजीचीही चर्चा अधिकच रंगली आहे.
वैभवने उपांत्यपूर्व फेरीत दोन बळी घेतले. त्याच्या आयपीएल संघ, राजस्थान रॉयल्सने, वैभवच्या दमदार गोलंदाजीचे कौतुक करण्यासाठी युवराज सिंगच्या फोटोसह एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराजने ही पोस्ट पाहताच प्रतिक्रिया दिली. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीच्या पोस्टवर युवराज सिंगने कमेंट केली. राजस्थान रॉयल्सने एक पोस्ट शेअर केली त्यात एका बाजूला वैभवचा फोटो तर दुसऱ्या बाजूला युवराज सिंगचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांची बॉलिंगल अॅक्शन सारखीच असल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच फोटोवर आपली प्रतिक्रिया युवराज सिंग यांनी दिली आहे.
वैभवच्या गोलंदाजीच्या ॲक्शनबद्दल युवराजने लिहिले, “त्याची ॲक्शन माझ्यापेक्षा चांगली आहे.” वैभवच्या गोलंदाजीच्या शैलीवर युवराज सिंगने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर झटपट पसरली आहे. युवराज सिंग हा टीम इंडियासाठी मधल्या फळीतील फलंदाज तसेच एक उत्कृष्ट गोलंदाज राहिला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याच्या नावावर एकूण १४८ बळी आहेत.
सेंट्रल झोनविरुद्धच्या उपांत्य फेरीत वैभवने आपले टी-२० कौशल्य दाखवत ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि अवघ्या ४२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. वैभवच्या दमदार फलंदाजीमुळेच ईस्ट झोनला २६६ धावांपर्यंत मजल मारता आली. वैभव नेहमीप्रमाणे शतकाच्या जवळ पोहोचून बाद झाला. वैभव आयपीएलमध्येही अनेकदा शतकाच्या अगदी जवळ पोहचून बाद झालेला पाहायला मिळाला आहे. काल ही तसेच झाले वैभवचे शतकी खेळीचे स्वप्न अर्धवट राहिले.