
Yuvraj Singh Family: बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा सुरु असतात. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराच सिंह देखील त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत… योगराज यांची ओळख आता युवीचे वडील म्हणून होते. पण आता ते त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. भारतासाठी फक्त एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळता आल्याची खंत त्यांना आहे, त्यामुळे मोठ्या मुलाला युवराजला क्रिकेटपटू बनवण्यासाठी ‘थर्ड डिग्री’ देण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत. योगराज यांनी मुलगा युवराज याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तर बनवलं. पण चांगले पती आणि पिता ते कधीच होऊ शकले नाहीत.
योगराज यांचं पहिलं लग्न युवराज सिंह याची आहे शबनम कौर यांच्यासोबत झालं होतं. लग्नाआधी शबनम मुसलमान होत्या. शबनम या एक अतिशय मॉर्डन महिला होत्या. पण, योगराज यांच्या रागीट स्वभावामुळे दोघांमध्ये वारंवार मतभेद आणि मारामारी होत असे. शबनम आणि योगराज यांना दोन मुलं देखील आहे… मोठा मुलगा युवराय आणि लहान मुलगा झोरावर…
युवराज आणि झोरावर तरुण असताना त्यांच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला. युवराज सिंह लहान असतानाच ते वेगळे झाले. घटस्फोटानंतर युवराज आणि जोरावर त्यांच्या आईसोबत राहत होते. शबनम यांना घटस्फोट दिल्यानंतर, योगराज यांनी 90 च्या दशकातील पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेल यांच्यासोबत लग्न केलं.
लग्नानंतर त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाल्यानंतर, नीना आणि योगराज यांच्यामध्ये प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघे अमेरिक राहू लागले…
नीना बुंदेल आणि योगराज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे… त्यांच्या मुलगा विक्टर अभिनय विश्वात सक्रिय आहे, तर मुलगी अमरजीत कौर रॅकेट प्लेयर आहे… पूर्वी ती टेनीस खेळायची… तिचं निकनेम एमी असं आहे… युवराज सिंह याचं त्यांच्या सावत्र भावंडांसोबत देखील चांगलं नातं आहे.