
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. युजवेंद्र क्रिकेटच्या मैदानात कायमच धमाका करताना दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र हा त्याच्या क्रिकेटपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2025 मध्ये युजवेंद्र चहल याने धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. लग्नाला 4 वर्ष होताच ते विभक्त झाले. कोरोनाच्या काळात धनश्रीकडे डान्सचा क्लास युजवेंद्रने लावला आणि त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस डेटिंग केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. मात्र, अचानक आयुष्यात मोठे वादळ आले आणि दोघांनी घटस्फोट घेतला. धनश्रीसोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्रचे नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडले. दोघे कायमच स्पॉट होताना दिसली. दोघे लंडनलाही एकत्र फिरण्यासाठी गेले. क्रिकेटच्या मैदानातही युजवेंद्रला सपोर्ट करताना आरजे महवश दिसली.
आरजे महवश आणि युजवेंद्र चहल कायमच स्पॉट होताना दिसले. यादरम्यान युजवेंद्र चहल एक्स पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबतही स्पॉट झाला. आरजे महवश हिला युजवेंद्र चहल डेट करत असल्याचे जवळपास स्पष्टच होते. दोघांचे कायमच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत. आरजे महवश आणि युजवेंद्र चहल यांनी एकमेकांना सोशल मीडियावर थेट अनफॉलो केले आणि दोघांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या.
आरजे महवश हिने थेट काही गोष्टी मुद्द्या केल्या जात असल्याचे म्हटले आणि लोक मला सोडून गेले ते बरे झाले मी माझ्या मानसिक आरोग्याची काळजी घेत असल्याचेही तिने म्हटले. आरजे महवश आणि युजवेंद्र चहल यांच्या ब्रेकअपची चर्चा असताना आणि त्यामध्ये आरजे महवश हिने आरोप करणारी पोस्ट शेअर केल्यानंतर आता युजवेंद्र चहल यानेही इंस्टास्टोरीला एक पोस्ट शेअर केली.युजवेंद्र चहल याने एक फोटो इंस्टा स्टोरीला शेअर केला.
ज्यामध्ये लिहिण्यात आले होते की, कृष्णाने अर्जुनाला म्हटले की, प्रत्येकजणच हा तुमच्या स्पष्टी करणासाठी नक्कीच पात्र नाही. कधी कधी गप्प राहणे यासोबतच लोक युकीचे आहेत हे स्वीकारणे महत्वाचे आणि योग्य आहे. युजवेंद्र चहल याने ही पोस्ट आरजे महवश हिच्या पोस्टला उत्तर म्हणूनच केल्याचा अंदाज लावला जात आहे. घटस्फोटाच्या दरम्यान युजवेंद्रचही बाजू घेऊन आरजे महवश ही धनश्री वर्मा हिला अनेकदा टोला लगावताना दिसली. मात्र, आता युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्यातच काहीतरी वाजल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.