AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेरी नजरों ने कुछ ऐसा जादू किया…’, चहलची बायको धनश्रीचा डान्स Video पाहिला?

भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा ही विविध डान्स स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरुन डान्सचे नवनवे प्रकार ती प्रेक्षकांना दाखवते. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance Video)

'तेरी नजरों ने कुछ ऐसा जादू किया...', चहलची बायको धनश्रीचा डान्स Video पाहिला?
धनश्री वर्मा
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jun 10, 2021 | 2:54 PM
Share

मुंबई :  भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma) ही विविध डान्स स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरुन डान्सचे नवनवे प्रकार ती प्रेक्षकांना दाखवते. आताही धनश्रीने एक नवा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत चाहत्यांची वाहवा मिळवलीय. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance Video)

तेरी नजरों ने कुछ ऐसा जादू किया…!

‘तेरी नजरों ने कुछ ऐसा जादू किया…’ या गाण्यावर धनश्रीने जोरदार ठुमके लगावले आहेत. धनश्रीचे ठुमके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले दिसून येत आहेत. धनश्रीच्या व्हिडिओवर प्रेक्षकांनी लाइक्स आणि कमेंट्स पाऊस पडलाय. या व्हिडिओत धनश्रीचा अंगावर दोन रंगाचे ड्रेस दिसून येत आहेत. व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये धनश्री पारंपारिक पोशाखात दिसून येत आहे. म्हणजेच तिच्या अंगावर सलवार-कुर्ता दिसून येतोय तर दुसऱ्या पार्टमध्ये धनश्रीच्या अंगावर जॅकेट दिसून येतंय.

सोशल मीडियाची राणी धनश्री

धनश्री वर्माचं एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला 15 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत. धनश्री इंस्टाग्रामवर देखील तितकीच अॅक्टिव्ह असते. प्रत्येक दिवसाची खबरबात ती आपल्या प्रेक्षकांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. अनेक गाण्यांना रिक्रिएट करून त्या गाण्यावर उत्तम डान्स करण्यासाठी धनश्री प्रसिद्ध आहे. धनश्रीने 2014 सायली डी वाय पाटील डेंटल कॉलेज मधून पदवी प्राप्त केली आहे.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच चहलची पोलखोल केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा तिच्या डान्सचा व्हिडीओ देखील तुफान लोकप्रिय झाला होता.

व्यवसायाने डेंटिन्स, कोरिओग्राफर, व्हिडीओला लाखोंचे संख्येने व्ह्यूज

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघंही विवाहबंधनात अडकले. भल्याभल्यांची विकेट घेणारा युजवेंद्रची विकेट धनश्रीने घेतलीय. धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance Video)

हे ही वाचा :

Video : चहलच्या बायकोचे पुन्हा लटके-झटके; पडद्याआडून युजवेंद्र प्रेक्षक, धनश्री म्हणते…

WTC Final : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विराट-रोहित नव्हे, तर टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली